लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : डीसीपीएसधारक शिक्षकांचा सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता शिक्षकांना त्वरित द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी व्यंकटाचारी अरवेली यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला.डीसीपीएसधारकांची सातव्या वेतन आयोगातील थकबाकी रोखीने द्यावी, असे निर्देश आहेत. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धानोरा तालुक्यातील शिक्षकांना थकबाकी मिळाली नाही. ही बाब जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव बापू मुनघाटे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी पुढील आठ दिवसांत सर्व शिक्षकांच्या खात्यावर रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले. मयत कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना मिळणाºया लाभाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविले जातील, अशी माहिती दिली. यावेळी बापू मुनघाटे यांच्यासह धानोरा तालुकाध्यक्ष दीपक सुरपाम, मंगेश दडमल, माजिद शेख, विकास दोडके, संजय निकोसे, जगदीश बावणे, राहुल पेंदोर, यशवंत कोराम, शत्रूकुमार मलिया, विनोद धारणे, शरद जगताप, रामगुलाल गवर्णा, गणेश हलामी हजर होते.कपातीच्या हिशोबाचे विवरण पत्र देणारडीसीपीएसधारक शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात केली जात आहे. मात्र अनेक शिक्षकांना अजूनपर्यंत या कपातीचा हिशोब मिळाला नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी असल्याची बाब गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. यावर प्रतिक्रिया देताना गटशिक्षणाधिकारी अरवेली यांनी सांगितले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे स्वत: लक्ष घालून प्रत्येक शिक्षकाला त्याच्या वेतन कपातीचे विवरण पत्र येत्या काही दिवसांतच उपलब्ध होतील, असे आश्वासन दिले. तालुक्यातील शिक्षकांच्या इतर समस्यांवरही चर्चा झाली.
सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM
डीसीपीएसधारकांची सातव्या वेतन आयोगातील थकबाकी रोखीने द्यावी, असे निर्देश आहेत. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही धानोरा तालुक्यातील शिक्षकांना थकबाकी मिळाली नाही. ही बाब जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा सचिव बापू मुनघाटे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली.
ठळक मुद्देधानोरा गटशिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा : महाराष्टÑ राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची मागणी