लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : राष्टÑीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविण्याचे काम करणाºया शालेय पोषण आहार कर्मचाºयांना मासिक १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, अशी मागणी आरमोरी पंचायत समितीच्या सभागृहात २ सप्टेंबर रोजी आयोजित पोषण आहार कर्मचारी युनियनच्या मेळाव्यात करण्यात आली.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रभान मेश्राम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, संघटनेचे राज्य महासचिव विनोद झोडगे, हरीपाल खोब्रागडे, संघटनेच्या अध्यक्ष वर्षा जुंपलवार, तालुका सचिव रूपाली हेडाऊ, रवींद्र कंगाले आदी उपस्थित होते. शालेय पोषण आहार कर्मचाºयांना इतर राज्यात आठ हजार पेक्षा अधिक मानधन दिले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातीलही शालेय पोषण आहार कर्मचाºयांना मानधन लागू करावे, अशी मागणी करण्यात आली.
शापोआ कर्मचाºयांना वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 9:46 PM
राष्टÑीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविण्याचे काम करणाºया शालेय पोषण आहार कर्मचाºयांना मासिक १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, .....
ठळक मुद्देआरमोरी येथे मेळावा : इतर राज्यांमध्ये अंमलबजावणी