निवेदनात म्हटले आहे की, भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरविण्यात येतो. संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. सदर योजना ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटांतील रोजगार करणाऱ्या कुटुंब प्रमुखास नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास, या अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास अनुक्रमे ३० हजार रुपये, ७५ हजार रुपये, ३० हजार पाचशे रुपये देण्यात येते. योजनेच्या जवळपास कुरखेडा तालुक्यातील ४३ लाभार्थी व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडाे लाभार्थ्यांनी तलाठी व तहसील कार्यालयामार्फत या योजनेंतर्गत विम्याच्या भरपाई रक्कम मिळण्यासाठी अर्ज सादर केले आहे, परंतु मागील अनेक वर्षांपासून या योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे या आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांना विमा भरपाई रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी खा.अशोक नेते व आ.कृष्णा गजबे यांच्याशी चांगदेव फाये यांनी चर्चा केली.
लाभार्थ्यांना विम्याची भरपाई रक्कम अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:25 AM