शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

शिक्षकांचे वेतन एसजीएसपीद्वारे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:33 PM

स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सुरू केले आहे. या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत. शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांसाठी अनेक फायदे : जुनी पेन्शन हक्क संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एसजीएसपी अकाऊंट (स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज) सुरू केले आहे. या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत. शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सद्य:स्थितीत प्राथमिक शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून होते. मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही विशेष सवलती दिल्या जात नाही. स्टेट बँक आॅफ इंडियाने एसजीएसपी हा कर्मचारी वर्गासाठी सुरू केलेला नवीन खात्याचा प्रकार आहे. या खात्यांच्या सभासदांना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे विविध सवलती लागू केल्या जातात. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी व शिक्षक या खात्याकडे आकर्षित होत चालले आहेत. राज्यातील काही जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन या खात्यातून करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या मुख्य मागणीबरोबरच १ नोव्हेंबर २००५ रोजी नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांचे अंशदायी परिभाषीत निवृत्ती वेतन योजनेंतर्गत कपात झालेल्या हिशोबाचे विवरणपत्र द्यावे, मयत शिक्षकांचे डीसीपीएस अंतर्गत झालेल्या कपातीच्या परताव्याचे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवावे, १२ वर्ष झालेल्या संपूर्ण शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याच्या प्रस्ताव पाठवाव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, उपाध्यक्ष अंकूश मैलारे, सरचिटणीस बापू मुनघाटे, वनश्री जाधव, गणेश आखाडे, दीपक सुरपाम, प्रशांत ठेंगरी, राजू सोनटक्के, निलकंठ शेंडे, प्रवीण धाडसे, गोरखनाथ तांदळे, अमित टेंभुर्णे, योगेश दमकोंडावार, विनोद रायपुरे, विश्वनाथ सोनटक्के, निकेश बन्सोड, किसन सोनुले, उमेश जेंगठे, निलेश कोडापे, खुमेंद्र मेश्राम, अंकूश मेश्राम आदी उपस्थित होते.काय आहेत एसजीएसपी खात्याचे फायदे?एसजीएसपीच्या खात्यात शुन्य शिल्लक असले तरी कोणतेही शुल्क लागत नाही. वेतनश्रेणीनुसार खात्याचे सिल्वर, गोल्ड, डायमंड, प्लाटिनम असे चार प्रकार पडले आहेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून कितीवेळा पैसे काढले तरी शुल्क लागत नाही. मागणीनुसार क्रेडीट कार्ड उपलब्ध होतो. २० लाख रुपये पर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण मिळते. विमान अपघाताचा ३० लाख रुपयांपर्यंतचा संरक्षण मिळते. वैयक्तिक कर्ज, कार, घर व शैक्षणिक कर्ज घेतल्यास व्याज दरात सुट मिळते. बँकेत लॉकर चार्जेसमध्ये २५ टक्के सुट आहे. कर्मचाºयास दोन महिन्याच्या पगाराऐवढी ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा आहे.