लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या ३६ महिन्याच्या थकबाकीचा पहिला हप्ता तत्काळ अदा करावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरमोरीचे गटशिक्षणाधिकारी दिनकर नरोटे यांच्याकडे सादर केले आहे.निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांच्या अंशदायी परिभाषित निवृत्ती वेतन अंतर्गत झालेल्या कपातीच्या हिशोबाचे वार्षिक विवरण द्यावे. जानेवारी ते जूनच्या वेतनातील थकबाकी अदा करावी. शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत करणे सक्तीचे आहे. मात्र ५ तारखेच्या आत कधीच वेतन होत नाही. कधीकधी तांत्रिक बाबींमुळे वेतन होण्यास एक महिन्याचा विलंब होतो. कर्जाचे हप्ते थकल्याने अतिरिक्त व्याज द्यावे लागते. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन होईल, यासाठी गटशिक्षणाधिकाºयांनी लक्ष घालावे आदी मागण्यांचे निवेदन गटशिक्षणाधिकाºयांना सादर केले.या समस्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. आपल्यास्तरावरील समस्या तत्काळ मार्गी लावल्या जातील. वरिष्ठ स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा सचिव बापू मुनघाटे, तालुकाध्यक्ष प्रशांत ठेंगरे, सचिव अशोक तागडे, निकेश बन्सोड, सदाशिव कुमरे, विश्वनाथ सोनटक्के, प्रदीप सिडाम, उमेश मसराम, सुनील पनकंटीवार, देवव्रत रामटेके, दुर्गादास कापकर, अतुल वाकळे, गणेश चौधरी, किशोर मेश्राम, चरणदास वटी, किशोर कुमरे, दिलीप घोडमारे, गोवर्धन शेंडे, चंद्रशेखर जांभुळे, अंजिरा भालाई, अतुल डोंगरे, शीतल चापले, ममीता कुळमेथे, प्रीती कुंभारे, सुषमा रामटेके यांच्यासह जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वेतनाची थकबाकी तत्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:35 AM
परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या ३६ महिन्याच्या थकबाकीचा पहिला हप्ता तत्काळ अदा करावा, यासह इतर मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरमोरीचे गटशिक्षणाधिकारी दिनकर नरोटे यांच्याकडे सादर केले आहे.
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जुनी पेंशन हक्क संघटनेचा पुढाकार