शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

नक्षलपीडित कुटुंबीयांनी दिला शांतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 11:47 PM

गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया .....

ठळक मुद्देअहिंसा दिनानिमित्त रॅली : अधिकार देण्यासाठी शासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे बेजार झालेल्या आणि प्रत्यक्ष त्याची झळ सहन करणाºया जिल्ह्याच्या विविध भागांतील नागरिकांनी सोमवारी अहिंसा दिनानिमित्त आपली व्यथा प्रशासनापुढे मांडत नागरिकांनाही शांतीचा संदेश दिला.शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्ह्यातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहीद कुटुंबीयांनी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ ‘नक्षलवाद मुदार्बाद’ च्या घोषणा देत आधी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चौकातून रॅली काढून नक्षल्यांकडून होणाºया त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदारांना निवेदन दिले.नक्षल्यांनी आतापर्यंत अनेक शाळा पाडल्या, मुलांचे शिक्षण रोखले. शासनाच्या महाराष्टÑ दर्शन सहलीच्या माध्यमातून राज्यातील इतर जिल्ह्यांची झालेली प्रगती पाहणाºया आमच्या मुलांनी सहलीला जावू नये म्हणून धमकावणारे नक्षलवादी हे स्वत:च्या मुलांना मात्र मोठ्या विद्यापीठात शिकवत आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. तसेच नक्षलवादी हे गोरगरीब आदिवासींच्या मजुरीचा पैसा खंडणी म्हणून गोळा करतात व रेती, खनिज, रिअल इस्टेट मध्ये स्वत:च्या फायद्यासाठी गुंतवतात ही वास्तव व विदारक परिस्थितीही सर्व कुटुंबियांनी मांडली.याचबरोबर जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प व दळणवळण सुविधा उभारुन आदिवासी बांधवांचा खºया अर्थाने विकास करावा, अशी मागणी देखील यावेळी नक्षलपीडित कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आलेल्या या पीडित कुटुंबियांमध्ये वृद्ध नागरिक, काही महिला तसेच मुलेही होती. या सर्वांच्या कुटुंबातील व्यक्ती नक्षली हिंसाचाराला बळी पडले आहेत. त्यांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते.४९१ निष्पाप आदिवासींच्या हत्येसाठी जबाबदार कोण?देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खून होऊनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा खडा सवाल नक्षलपीडित कुटुंबीयांनी निवेदनामध्ये केला आहे.मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरीने शस्त्रे देऊन देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाºया या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही सवाल कुटुंबियांनी केला.प्रथमच अशा पद्धतीने नक्षलपीडित कुटुंबीय शांततेच्या मार्गाने विरोध प्रदर्शन करीत रस्त्यावर उतरल्यामुळे गडचिरोली नागरिक त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत होते. या शांतता रॅलीसाठी पोलिसांसह काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जागृती केली.