शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

पीक पेरणी १० टक्क्यांवर पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:59 PM

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.

ठळक मुद्देकेवळ २५ हेक्टरवर धान रोवणी : जिल्हाभरात ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पऱ्हे टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र आतापर्यंत रोवणीच्या कामाने वेग घेतलेला नाही. जवळपास २५ हेक्टर इतकीच धान रोवणी होऊ शकली. यंदाच्या खरीप हंगामात तब्बल ७ हजार ३२० हेक्टर क्षेत्रावर आवत्या स्वरूपात पेरणी करण्यात आली आहे. रविवारपर्यंत धान रोवणीची टक्केवारी १० टक्क्यांवर पोहोचली.गडचिरोली जिल्ह्यात धान व इतर सर्व पिकांची मिळून एकूण १ लाख ५३ हजार २२८ इतके खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी ५ हजार ८७८ इतके भात नर्सरीचे एकूण क्षेत्र आहे. धानोरा, गडचिरोली, कुरखेडा व कोरची आदी तालुके मिळून रोवणी केवळ २५ हेक्टरवर झाली आहे. सर्व पिकांची मिळून एकूण १० टक्के पेरणी झाली आहे. मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना अपेक्षीत पाऊस झाला नाही. दोन ते तीन दिवस झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी धान पऱ्हे टाकण्याचे काम लगबगीने आटोपले. अनेक शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपातील पेरणीही पूर्ण केली. आद्रा नक्षत्राच्या पावसामुळे शेतजमिनीतील पºह्यांना अंकूर फुटले. मात्र त्यानंतर जोरदार पाऊस बरसला नाही. अनेक ठिकाणचे पऱ्हे रोवणीयोग्य झाले असले तरी पाऊस नसल्याने बºयाच शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामास अद्यापही प्रारंभ केला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत नांगरणी व वखरणी तसेच इतर कामे पूर्ण करून रोवणीचे काम सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या तीन-चार दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास अर्ध्याअधिक जिल्ह्यात रोवणीच्या कामास धडाक्यात सुरूवात होणार आहे. सद्य:स्थितीत आरमोरी तालुक्याच्या वैरागड भागात उपलब्ध असलेल्या सिंचन सुविधेच्या भरवशावर काही शेतकºयांनी धान रोवणीचे काम हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्पाची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट नाही. त्यामुळे येथील शेतकºयांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवड केली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात पाच हेक्टर, कोरची तालुक्यात एक व चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ४६ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाचा समावेश आहे. ३१ हेक्टर क्षेत्रात इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली. ४ हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर तूर तर २३ हेक्टर क्षेत्रावर मूग व उडीद पिकाची लागवड करण्यात आली आहे. भूईमूग केवळ दोन हेक्टर क्षेत्रावर आहे. ३२० हेक्टर क्षेत्रावर तीळ तर ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन पिकाची पेरणी करण्यात आली आहे.दरवर्षी सूर्यफुलाची लागवड अनेक शेतकरी करीत होते. मात्र यंदा सूर्यफूल पिकाची लागवड झाली नसल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून दिसून येत आहे.धानोरात सर्वाधिक आवत्याधान रोवणी व लागवडीचा खर्च परवडत नाही तसेच रोवणीसाठी मजुराची टंचाई भासत असल्याच्या कारणावरून बरेच शेतकरी आवत्या टाकतात. यंदाही काही शेतकºयांनी आवत्या स्वरूपात पेरणी केली आहे. विशेष म्हणजे, धानोरा तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी आवत्या स्वरूपात धानाची पेरणी केली आहे. त्यानंतर आरमोरी तालुक्यात १ हजार ६४० हेक्टर, गडचिरोली तालुक्यात १ हजार ४९० तर कुरखेडा तालुक्यात ४११ हेक्टर क्षेत्रावर आवत्या आहे. कोरची व चामोर्शी तालुक्यातही काही शेतकऱ्यांनी आवत्या स्वरूपात धान पेरणी केली आहे.२ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूसचामोर्शी, गडचिरोली व इतर तालुक्यात मिळून यंदाच्या खरीप हंगामात २ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात सर्वाधिक २ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे.