गडचिराेली : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगाच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांगांना विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तीकडून करण्यात येत आहे.
व्यायाम शाळा उभारण्याची मागणी
चामाेर्शी : तालुक्यातील काही गावात व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. चामाेर्शी तालुक्यातील अनेक गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र अजूनही काही गावांत व्यायाम शाळाच नाहीत.
सैराट वाहनचालकामुळे नागरिक त्रस्त
गडचिराेली : येथील गांधी चाैक परिसरात मागील काही दिवसांपासून काही युवक सैराटपणे वाहन पळवित आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.
हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत
गडचिराेली : कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प पडले होते. दरम्यान, प्रशासनाने शिथिलता देत बाजारपेठ सुरु केली आहे. यामध्ये हॉटेलसुद्धा सुरु करण्यात आले आहे. मात्र पाहिजे तसे ग्राहकच फिरकत नसल्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत. शहरात तसेच जिल्ह्यात मोठ्या संख्येने हॉटेल्स आहेत.
बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गडचिराेली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहे. असे असतानाही आठवडी बाजारात सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.
पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा
गडचिराेली : शहरात मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचोर शाळा, महाविद्यालय, शहरातील विविध चौक तसेच कॉम्प्लेक्समधील वाहनतळातून पेट्रोल चोरी करतात. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.