शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
3
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
5
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
6
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
7
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
8
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
9
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
10
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
11
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
12
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
13
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
14
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
15
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
16
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
17
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
18
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
19
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!

लोक अदालतीत ९० प्रकरणे निकाली

By admin | Published: July 10, 2017 12:36 AM

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.

जिल्हाभर लोक न्यायालय : १३ लाखांचा दंड वसूललोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये शनिवारी लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. गडचिरोली येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत प्रलंबित असलेले एकूण ७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणातून शासनाला ११ लाख ४२ हजार ४५७ रुपयांचा महसूल मिळाला. सदर लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांच्या नियंत्रणाखाली दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) ता. के. जगदाळे यांच्या देखरेखीखाली आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी पॅनल क्र. १ वर पॅनल प्रमुख काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश ता. के. जगदाळे यांनी पॅनल क्र.२ वर पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी पॅनल क्र. ३ चे पॅनल प्रमुख काम पाहिले. यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.धानोरा येथे लोक अदालतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी एकूण चार प्रकरणे भारत संचार निगम लिमिटेडची २०६ व नगर पंचायतीचे १ असे एकूण २११ प्रकरणे तडजोडीकरिता ठेवण्यात आली होती. यात भारत संचार निगम लिमिटेडची ८ व धानोरा नगर पंचायतीचे १ अशी ९ दाखलपूर्व प्रकरणे समझोत्याने निकाली काढण्यात आली. ७७ हजार ७०० रूपये दंड वसूल करण्यात आला. तसेच महिला संरक्षण कौंटुंबिक हिंसाचार संबंधी दोन्ही मामले ४६ हजार ७८६ रूपये दंड वसूल करून निकाली काढण्यात आले. ११ प्रकरणांमध्ये १ लाख २४ हजार ४८६ रूपयांची तडजोड करून प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्या. लि. दा. कोरडे, सदस्य म्हणून सहायक सरकारी अधिवक्ता बी. के. खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या एस. जे. झंझाळ यांनी काम पाहिले. आरमोरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश एस. एच. अतकारे, सदस्य म्हणून अधिवक्ता आर. आर. पाचपांडे, व्ही. आर. निंबेकार, अ‍ॅड. जांभुळकर उपस्थित होते. लोकन्यायालयात एकूण १६ फौजदारी प्रलंबित प्रकरणे व १४ दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आले. एसएसईबी, बीएसएनएल व बँकिंगचे एकूण २५८ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ४ फौजदारी व २ दिवाणी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी अधिवक्ता अमोल कानकाटे, सहायक सरकारी अधिवक्ता एस. एन. रासेकर, सी. एल. दरेकर व कर्मचारी उपस्थित होते. चामोर्शी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात २५ दिवाणी व ४४ फौजदारी दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. तसेच ग्राम न्यायालय मुलचेराची ५ दिवाणी स्वरूपाची प्रकरणे ठेवण्यात आली. यापैकी फौजदारी स्वरूपाचे महिलांसंबंधीचे १ प्रकरण आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आले. तसेच २ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढून ६ हजार २७३ रूपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख दिवाणी न्या. एम. झेड. ए. ए. क्यू. कुरेशी, सदस्य अ‍ॅड. एम. डी. सहारे, सामाजिक कार्यकर्ता डाळिंबा साखरे, अधिवक्ता ए. जे. उंदीरवाडे, के. टी. सातपुते, दोनाडकर, चिळंगे, डिम्पल उंदीरवाडे, के. टी. मुनघाटे उपस्थित होते. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी लिपीक पुणेकर, पी. डी. कोसारे, नेताजी करंबे, सुधाकर भिसे, विनायक सहारे, गांगरेड्डीवार, शिल्पा जुनारकर, शिपाई संतोष चलाख, लता उके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.