कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनाच्या संचारबंदीने दळणवळण, वाहतूक व बाजारपेठ बंद असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लाखो रूपयांची गुंतवणूक करून पिकविलेली लाल मिरची विक्रीअभावी शेतशिवार तसेच घरी पडून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे.तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी मिरची उन्हात वाळल्यानंतर मिरची घरी असलेल्या ढोलीमध्ये सुरक्षितरित्या ठेवली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरातील व्यापाऱ्यांना मिरची विकण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरचीची विक्री करता आली नाही. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे संकट उद्भवले. संचारबंदी व बाजारपेठ बंदमुळे शेतमालाची वाहतूक थांबली. उत्पादित मिरची विक्रीअभावी पडून असल्याने सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लालरंगाची मिरची पांढरी पडत असून भाव कमी मिळण्याच्या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले आहेत.माल नेण्याची मुभा द्याएक हेक्टर क्षेत्राच्या मिरची पिकासाठी शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रूपये खर्च येतो. मोठी गुंतवणूक करूनही मिरची बाजारपेठेत पोहोचू न शकल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नागपूरच्या मिरची बाजारात सिरोंचातील मिरची नेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मिरची उत्पादक शेतकºयांनी केली आहे.
मिरची उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 5:00 AM
तालुक्यातील कोटापल्ली, रेगुंठा, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा या भागातील शेतकरी दरवर्षी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड करतात. यावर्षी सुद्धा या भागातील शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले आहे. झाडाची मिरची पिकल्यानंतर त्याची तोडणीसुद्धा मजुरांकडून करण्यात आली आहे. तोडलेल्या मिरचीचे ढीग शेतशिवारात करण्यात आले आहे.
ठळक मुद्देशेतात व घरी पडून : कोरोनाच्या संचारबंदीने वाहतूक व विक्री थांबली