आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे निवेदन
अहेरी : शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नाेंदणी शेतजमिनीच्या सातबारावर स्वतःच करता यावी, यासाठी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून माहिती भरण्याची माेहीम सुरू केली आहे; परंतु ही माहिती भरण्याचे काम पूर्वीप्रमाणे तलाठी अथवा कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे,अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार व अन्य पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यासमवेत दि. २५ सप्टेंबर रोजी आमदारांना याबाबत निवेदन दिले. अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल दुर्गम भागात अनेक गावांत आजही शेतकऱ्यांकडे साधे मोबाइल नाही. असले तरी व्यवस्थित रेंज नाही. ९० टक्के शेतकऱ्यांना हा ॲप कसा हाताळायचा व माहिती कशी भरायची याबाबत माहिती नाही. इंटरनेचीही समस्या असल्याने ई-पीक नोंदणीचे काम पूर्वीप्रमाणेच तलाठी कार्यालयामार्फत करावे, अशी मागणी निवेदनातून केली. नाेंदणी न झाल्यास शेतकऱ्यांचे शेत पडीक दाखवून त्याला दुष्काळ निधी व अन्य मदतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे ई-पीक पाहणीचे काम तलाठ्याद्वारे करावे, अशी मागणी श्रीनिवास वीरगोनवार यांच्यासह नागेश मडावी, मखमूर शेख, सत्यना मिरगा, सांभय्या करपेत यांनी आमदार आत्राम यांच्याकडे केली.
बाॅक्स
शासनाकडे पाठपुरावा करणार
आमदार धर्मराव बाबा आत्राम
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वतः ई-पीक पाहणी ॲपद्वारे माहिती भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा विषय शासनाकडे लावून धरणार आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी कृषिमंत्री तथा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
250921\img-20210925-wa0161.jpg
निवेदन देताना पदाधिकारी