लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सी-६० व सीआरपीएफच्या पोलीस जवानांनी २२ व २३ एप्रिल रोजी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची मान देशभरात उंचावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.पोलीस महासंचालक माथूर यांनी बुधवारी गडचिरोली येथे येऊन २२ व २३ एप्रिल रोजी भामरागड व अहेरी तालुक्यात झालेल्या नक्षल चकमकीत सी-६० व सीआरपीएफच्या पोलीस जवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावित ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळविले. त्याबद्दल पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी गडचिरोली गाठून सदर चकमकीतील पोलीस जवानांचे कौतुक केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला नक्षल विरोधी अभियानाचे अप्पर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम, विशेष पोलीस महानिरिक्षक शरद शेलार, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस महासंचालकांनी सीआरपीएफ पोलीस जवानांशी मुक्त संवाद साधला.
‘त्या’ कामगिरीने पोलीस दलाची मान उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:24 AM
सी-६० व सीआरपीएफच्या पोलीस जवानांनी २२ व २३ एप्रिल रोजी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र पोलीस दलाची मान देशभरात उंचावली आहे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.
ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचे प्रतिपादन : सी-६० व सीआरपीएफ जवानांचे केले कौतुक