शहरं
Join us  
Trending Stories
1
माघार, अश्रूसंताप अन् अंत्ययात्रा... नाट्यमय घडामोडींनी गाजला सोमवार; कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला
2
भाजप+ १५०; काँग्रेस १०० पार; तर शिंदेसेनेने दिले ८० उमेदवार; भाजपच्या नेत्यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी
3
सावधान! फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक, दरवर्षी पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते
4
दिवाळीत सराफा बाजारात होणार २५०० कोटींची उलाढाल; सोने-चांदी, हिरे लखलखणार
5
अनिल देशमुखांऐवजी मुलास दिली उमेदवार; शरद पवार गटाचे सात उमेदवार जाहीर
6
वांद्रे टर्मिनसवर ‘त्या’वेळी केवळ १४ कर्मचारी?, रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
7
रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास
8
गोरखपूर रेल्वे सोडली, पण १२ डबे रिकामेच, साेडलेल्या गाडीची प्रवाशांना माहितीच नाही
9
धमकी देण्याचे प्रकार सुरूच, पुन्हा ६० विमानांना  बाॅम्बच्या धमक्या
10
‘केबीसी’त कोटींचे बक्षीस! करापाेटी लाखोंचा चुना, सीबीआयकडून आरोपीचा शोध सुरू
11
एअर इंडिया कर्मचाऱ्यांची दिवाळी जाेरात, भत्त्यात वाढ
12
इंजिनीअर रशीद यांचे तिहारमध्ये आत्मसमर्पण , जामिनावर न्यायालयाचा निर्णय लांबणीवर
13
काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला
14
गोपाळ शेट्टी बाेरीवलीतून बंडखोरीच्या पवित्र्यात, स्थानिकांच्या सन्मानासाठी अपक्ष म्हणून लढणार
15
हसवता-हसवता रडवून गेल्या अतुलच्या आठवणी; एमआयजी क्लबमध्ये कलाकार, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी वाहिली आदरांजली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
19
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

चामोर्शीतील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:58 PM

गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी?

ठळक मुद्देज्येष्ठ सदस्यांचा सवाल : स्थायी समितीत गाजला देणगी वसुलीचा घोळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या ९ व १० डिसेंबरला चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेचा शताब्दी महोत्सव कुणाच्या परवानगीने घेतला? हा महोत्सव शाळेच्या सन्मानासाठी होता की आमदारांच्या गवागव्यासाठी? असे प्रश्न उपस्थित करीत या महोत्सवासाठी संकलित करण्यात आलेल्या निधीत घोळ झाला, त्याची चौकशी करा अशी मागणी बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. यामुळे जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी सभापती अतुल गण्यारपवार यांनी या शताब्दी महोत्सवावरून चांगलाच संताप व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या शाळेचा शताब्दी महोत्सव असताना त्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती का? ती घेतली का? असे प्रश्न केल्यानंतर शिक्षणाधिकारी ओ.बी. गुढे यांनी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय शाळा व्यवस्थापन समिती आयोजक म्हणून असणे गरजेचे असताना आमदार डॉ.देवराव होळी यांनी स्वत:चे नाव आयोजक म्हणून टाकून स्वत:चा गवगवा केला. बीडीओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनाही हेतूपुरस्सर डावलल्याचा आरोप गण्यारपवार यांनी केला.लाखोंच्या देणग्या गेल्या कुठे?विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी काही अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. पण प्रत्यक्ष शाळेची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही किंवा शाळेतील सुविधांसाठी कोणताही हातभार लावला नाही. मग गोळा केलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या कुठे गेल्या? त्याचा हिशेब सादर करावा, अशी मागणी अतुल गण्यारपवार यांनी केली.विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांना डावललेशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सदर जि.प.शाळेत शिकलेल्या आणि विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव होणे अपेक्षित होते. त्यात प्रामुख्याने माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, स्थानिक जि.प.सदस्य तथा बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारवार, माजी सभापती गंगाधरराव गण्यारपवार यांच्यासह अनेक डॉक्टर, अभियंते, उद्योजक या शाळेत शिकलेले आहेत. पण कोणालाही कार्यक्रमाचे साधे निमंत्रणसुद्धा दिल्या गेले नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.