जानेवारी २०१७ मध्ये पेट्राेलचा भाव ७० रुपये व डिझेलचा भाव ६० रुपये प्रती लिटर हाेता. १७ जानेवारी २०२१ राेजी पेट्राेलचा भाव प्रती लिटर ९१.९६ रुपये, तर डिझेलचा भाव ८१.०४ रुपये एवढा आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलच्या किमतीत प्रती लिटर जवळपास २० रुपये भाववाढ झाली आहे. जवळपास सव्वा पटीने भाववाढ झाली आहे.
बाॅक्स
सर्व कारभार ऑनलाईन
गडचिराेली शहरात दर दिवशी जवळपास १० हजार लिटर डिझेल व पेट्राेलची विक्री हाेते. रिलायन्स, इंडियन ऑईल, भारत पेट्राेलिअम, हिंदुस्थान पेट्राेलियम या चार कंपन्यांमार्फत पेट्राेल व डिझेलचा पुरवठा हाेताे. प्रत्येक दिवशी दरात बदल करण्याचा निर्णय घेतल्यापासून शहरातील सर्वच पेट्राेल पंपांचा कारभार ऑनलाईन करण्यात आला आहे. पेट्राेल व डिझेलच्या सर्वच मशीन ऑनलाईन जाेडण्यात आल्या आहेत. रात्री १२ वाजता आपाेआप मशीनवरील दर बदलतात. पूर्वी हे दर हाताने बदलविले जात हाेते. आता मात्र ऑनलाईन बदलतात. पेट्राेल विक्रीचा हिशेबही ऑनलाईनच ठेवला जातो. त्यामुळे पेट्राेलच्या काळाबाजारीवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आले आहे.
बाॅक्स .....
महागाईत पडली भर
डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यास वाहतूक व्यवसाय प्रभावित हाेते. याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर हाेते. डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतुकीचे दर वाढतात व महागाईत वाढ हाेते. शेतीची मशागत करणारे ट्रॅक्टरसह इतर बहुतांश यंत्र डिझेलवरच चालतात. डिझेलची भाववाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ हाेते. पेट्राेलच्या किमती दरदिवशी वाढत असल्या तरी मजुरी दरदिवशी वाढत नाही. याचा फटका मजुरांसह सामान्य नागरिकांना बसताे.
काेट ........
चार वर्षांपूर्वी सरकार दर १५ दिवस किंवा १ महिन्याने पेट्राेल व डिझेलचे भाव वाढवीत हाेता. एकावेळी झालेली भाववाढ ग्राहकांच्या नजरेस पडत हाेती. ही भाववाढ मागे घेण्यासाठी आंदाेलने केली जात हाेती. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर आता दरदिवशी पेट्राेल व डिझेलच्या दरात बदल करण्याचा अधिकार कंपन्यांना दिला आहे. कंपन्या दरदिवशी १० ते १५ पैसे भाव वाढ करीत आहेत. महिन्याकाठी माेठ्या प्रमाणात भाववाढ हाेत असली तरी ही भाववाढ नागरिकांच्या लक्षात येत नाही. शासनाच्या विराेधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदाेलन छेडले जाईल.
- महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, गडचिराेली
काेट ...........
पेट्राेल व डिझेल अत्यावश्यक वस्तूमध्ये माेडणारी वस्तू आहे. पेट्राेल व डिझेल दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर पडत आहे. महागाई वाढण्यामागे पेट्राेल व डिझेलची भाववाढ कारणीभूत आहे. विद्यमान केंद्र शासनाला सामान्य जनतेबाबत सहानुभूती असती तर डिझेलवर काही प्रमाणात सबसिडी दिली असती; मात्र केंद्र शासन पेट्राेल व डिझेलवर माेठ्या प्रमाणात कर आकारून यातून नफा कमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र शासनाविराेधात जनआंदाेलन उभे केले जाईल.
- विश्वजित काेवासे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव, गडचिराेली.