गडचिराेली : पेट्राेल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ हाेत असल्याने त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर हाेत आहे. भाजीपाला, किराणा तसेच मालवाहतुकीचेही दर वाढले आहेत.
भाजीपाला पिकविण्यापासून ते वाहतूक करण्यापर्यंत डिझेलचा वापर हाेतो. शेकडाे किमी अंतरावरील भाजीपाला, किराणा साहित्य आणून विकले जाते. इतरही वस्तूंची वाहतूक केली जाते. त्यामुळे डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यास वाहतुकीचे दर वाढून त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किमतीवर हाेत असल्याचे आजपर्यंत अनेकवेळा सिद्ध झाले आहे. दरदिवशी पेट्राेल व डिझेलच्या दरामध्ये वाढ हाेत असल्याने इतरही वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अपवाद वगळता प्रत्येक नागरिकाकडे दुचाकी आहे. गरीब नागरिक केवळ अत्यावश्यक कामांसाठीच दुचाकीचा वापर करतात. मात्र पेट्राेलचे दर वाढल्याने वाहनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे वाढीव मजुरी दिल्याशिवाय मजूर कामावर येण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स...
ट्रॅक्टरची शेती महागली
मागील वर्षी डिझेलचा दर ७० रुपये प्रतिलिटर हाेता. सध्या डिझेलचा दर ९७ रुपये एवढा झाला आहे. डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर २५ रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे शेती मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरचे भाडेसुद्धा वाढविण्यात आले आहे. मागील वर्षी साधी नांगरणीचे दर ७०० रुपये प्रतितास व चिखल तयार करण्याचे दर ८०० रुपये प्रतितास हाेता. यावर्षी साधी नांगरणीचे दर ८०० रुपये प्रतितास, तर चिखल करण्यासाठी एक हजार रुपये प्रतितास घेतला जात आहे. शेवटी डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे.
बाॅक्स...
भाजीपाला महागला
गडचिराेली येथील बाजारपेठेमध्ये नागपूर येथून भाजीपाला येतो. गडचिराेलीपासून नागपूर १७० किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरून भाजीपाला आणला जात असल्याने वाहतुकीचा खर्च माेठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे डिझेल दरवाढीचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या किमतीवर हाेत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश भाजीपाला १५ ते २० रुपये पाव दराने विकलाजात आहे.
बाॅक्स.. .
डिझेल दरवाढ व वस्तूंची दरवाढ यांचा थेट संबंध आहे. डिझेलच्या दरात वाढ झाल्याबराेबरच वाहतूकदार वाहतुकीचे दर वाढवितात. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढविल्याशिवाय पर्याय राहत नाही. डिझेलच्या किमती दरवर्षी वाढत असल्याने इतर वस्तूंच्या किमती किमान आठ दिवसांतून वाढविल्या जातात. याचा परिणाम ग्राहकांनाच भाेगावा लागतो.
- अमाेल धंदरे, व्यावसायिक
..........................
घर चालविणे झाले कठीण
मागील महिनाभरात भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. प्रत्येक भाजीपाला १५ ते २५ रुपये पाव दराने खरेदी करावा लागत आहे. ४०० रुपयांचा भाजीपाला थैलीभरही येत नाही. किराणाचेही दर वाढले आहेत. त्यामुळे एकंदरीत खर्चात जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे. काेराेनामुळे अनेकांचे राेजगार बुडाले असताना दैनंदिन खर्चात मात्र वाढ झाली आहे.
- मनीषा जवादे, गृहिणी
................
पेट्राेल व डिझेलच्या किमतीचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर हाेत असल्याने सरकारने किमान डिझेलच्या किमती वाढवू नये. डिझेलच्या किमती वाढल्यानेच महागाईत वाढ हाेत आहे. शासनाने या किमतीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
- मंजूषा मडावी, गृहिणी
बाॅक्स...
असे वाढले पेट्राेल-डिझेलचे दर
जानेवारी २०१८ - ८१-६४
जानेवारी २०१९ - ७७-७०
जानेवारी २०२० - ८१-७२
जानेवारी २०२१ -
फेब्रुवारी - ९९-८९
मार्च - ९९-८९
एप्रिल - ९८-८८
मे - १०२-९२
जून - १०६-९६
जुलै - १०७-९७
बाॅक्स...
भाजीपाल्याचे दर
आलू - ३०
वांगे - ५०
कांदे - ३०
फुलकाेबी - ८०
टमाटे - ४०