लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन जिमलगट्टाच्या वतीने गुरूवारी जिमलगट्टा येथे बिरसामुंडा जयंतीनिमित्त महिलांचा जनजागरण मेळावा तसेच आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या मेळाव्यात अनेक आदिवासी महिलांच्या समुहाने रेला व इतर पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या नृत्याच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांनी येथे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.मेळाव्याचे उद्घाटन पंचायत समितीच्या सदस्या प्रांजली शंभळकर यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर, वाचक फौजदार व्यंकट गांगलवड, प्रकल्प निरिक्षक आर. के. नंदेश्वर, डॉ. पाटील, मंडळ अधिकारी सिडाम, सरपंच सरीता गावडे, अंगणवाडी सेविका वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार पुरविण्यात आला. गावातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय उपस्थित मान्यवरांनी कृषीविषयक योजना व रोजगाराबाबतची माहिती दिली. महिलांना रोजगारासंदर्भाची माहिती प्रात्यक्षिकातून देण्यात आली. आदिवासी रेलानृत्य स्पर्धेत यदरंगा येथील समुहाने प्रथम क्रमांक, पत्तीगावच्या समुहाने द्वितीय तर लखनगुडा येथील समुहाने तृतीय क्रमांक पटकाविला. या विजेत्या समुहांना अनुक्रमे रोख तीन हजार, दोन हजार व एक हजार रूपयांचे बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या मेळाव्याला उपपोलीस ठाण्याच्या परिसरात ९०० ते एक हजार महिला तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी सुरज निंबाळकर यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जिमलगट्टात आदिवासी संस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:29 AM
जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन जिमलगट्टाच्या वतीने गुरूवारी जिमलगट्टा येथे बिरसामुंडा जयंतीनिमित्त महिलांचा जनजागरण मेळावा तसेच आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या मेळाव्यात अनेक आदिवासी महिलांच्या समुहाने रेला व इतर पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ठळक मुद्देजनजागरण मेळावा : शेकडो नागरिकांवर मोफत औषधोपचार