वैरागड गावातील प्रमुख रस्त्यांपैकी करपडा हा एक रस्ता आहे. महात्मा जाेतिबा फुले चौक ते आदिशक्ती माता मंदिराकडे व पुढे विहीरगाव घाटाकडे जाणारा हा रस्ता असून, येथून नेहमीच वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला परिसरातील नागरिक आपल्या घरातील केरकचरा आणून टाकत असल्याने, शाळेसमोरच ढीग तयार झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हा कचरा इकडेतिकडे पसरून त्या ठिकाणी घाण तयार झाली आहे. सध्या या मार्गाने ये-जा करणे कठीण झाले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर निवासी आश्रम शाळेत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम पडू शकतो. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग त्याच ठिकाणी ठिकाणी विद्युत राेहित्र आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी याच ढिगावर उभे राहून विद्युत दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे अंकुर आश्रमशाळेतील कर्मचारी व परिसरातील नागरिकांना हाेणारा त्रास लक्षात घेऊन कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
गाळ उपशावर खर्च, मात्र कचऱ्याकडे दुर्लक्ष
अंकुर आश्रमशाळेसमाेर कचरा टाकण्यावर प्रतिबंध घालावा, तसेच जमा झालेल्या कचऱ्याची उन्हाळ्यातच विल्हेवाट लावावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती, परंतु लाखो रुपये खर्च दाखवून नाल्या स्वच्छ करणाऱ्या ग्रामपंचायतीने कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावली नाही. गाळ उपशावर लाखाे रुपयांचा खर्च करण्यात आला, परंतु कचऱ्याचे ढीग कायम आहे. ढिगातील दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास हाेत आहे.
230721\img_20210722_165111.jpg
शाळेसमोरील कचर्याचा ढीग