शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

मूल मार्गावरील पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 10:44 PM

मूल मार्गावरील महिला महाविद्यालयासमोर कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसांपासून कॉम्प्लेक्सचा पाणीपुरवठा बंद : नगर परिषदेमार्फत दुरूस्तीचे काम सुरू

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : मूल मार्गावरील महिला महाविद्यालयासमोर कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली आहे. सदर पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्याने मागील तीन दिवसांपासून कॉम्प्लेक्स परिसराचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.पाणी शुद्धीकरण केंद्रावरून कॉम्प्लेक्स परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मुख्य रस्त्याच्या बाजूला टाकली आहे. या पाईपलाईनमधून एलआयसी कार्यालयाजवळील पाण्याची टाकी, जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारातील पाणी टाकी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पाणी टाकीत पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन वर्षांपासून महिला महाविद्यालयासमोर पाईपलाईन लिकेज झाली होती. सदर पाईपलाईन दुरूस्ती करण्याचे काम तीन दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले. दुरूस्तीसाठी खोदकाम केले असता, पाईपाजवळची माती निघून गेल्याने आणखी लिकेज वाढून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. एकूण पाणीपुरवठ्याच्या जवळपास ८० टक्के पाणी बाहेर जात असल्याने मागील तीन दिवसांपासून पाण्याच्या टाक्या भरण्यास अडचण येत आहे. परिणामी तीन दिवसांपासून कॉम्प्लेक्स परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पाणीपुरवठा बंद झाला आहे.खोदकामानंतर पाईपलाईन दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र सदर पाईपलाईन जुनी आहे. त्यामुळे या पाईपलाईनचे सामान मिळण्यास अडचण जात आहे. गडचिरोली व चंद्रपूर येथे सुद्धा दुरूस्तीसाठी आवश्यक असलेले टेलपीस हे साहित्य मिळाले नाही.नागपूर येथून साहित्य आणले जाणार आहे. त्यामुळे किमान पुन्हा दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागपूर येथून आणावे लागणार साहित्यगडचिरोली येथील पाणीपुरवठा पाईपलाईन जुनी आहे. लिकेजच्या ठिकाणी टेलपीस लावणे आवश्यक आहे. सदर साहित्य आणण्यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाºयाला चंद्रपूर येथे पाठविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर येथे साहित्य मिळाले नाही. त्यामुळे नागपूर येथील दुकानातून साहित्य बोलविले जाणार आहे. बुधवारी सदर साहित्य उपलब्ध झाल्यानंतर सायंकाळपर्यंत लिकेज दुरूस्ती केली जाईल. त्यानंतर गुरूवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचण जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. पाईपलाईन दुरूस्तीसाठी आपण स्वत: प्रयत्नशील असल्याची माहिती नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.