छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशात होणारी जड वाहतूक ही कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी व्हाया गडचिरोली या राज्य मार्गाने न होता ही वाहतूक गोठणगाव फाटा ते वैरागड-ठाणेगाववरून गडचिरोलीकडे होते. त्यामुळे वैरागड ते कढाेली या जिल्हा मार्गाची एक-दोन वर्षांच्या अंतराने दुरुस्ती होऊनदेखील रस्त्याची कमालीची दुरवस्था होते. राज्य मार्ग असताना शार्टकटसाठी या मार्गाने आंतरराज्य जड वाहतूक केली जाते. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारदेखील केली होती; परंतु याकडे जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाचे दुर्लक्ष झाले. वैरागड-कढाेली मार्गादरम्यान असणाऱ्या बोडीलगत मागील वर्षात सीडी वर्कचे बांधकाम झाले. त्याच ठिकाणी हा खड्डा पडला आहे. हा खड्डा रहदारीसाठी अडचणीचा ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा लवकर बुजवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
010721\0924img_20210701_071337.jpg
वैरागड कढोली मार्गावर पडलेला खड्डा