देचलीपेठा-जिमलगट्टा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणचे खड्डे तर अपघाताला निमंत्रण देत हाेते. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांसह परिसरात नक्षलविराेधी अभियान राबविणारे पाेलीस जवान, एसआरपीएफ व सीआरपीएफच्या जवानांना अडचणी येत हाेत्या. ही अडचण लक्षात घेऊन देचलीपेठा पाेलीस व अर्धसैनिक दलाच्या जवानांनी नागरिकांच्या सहकार्याने श्रमदान करून देचलीपेठा ते जिमलगट्टा मार्गावरील बहुतांश ठिकाणचे खड्डे मुरूम व दगड टाकून बुजविले. याप्रसंगी देचलीपेठा उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुधीर साठे, पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा, गोमेद पाटील, गोविंद कटिंग, सीआरपीएफ बटालियनचे सहायक कमांडंट मोहम्मद शकील, पीआय नोबिन सिंग, तसेच पाेलीस व एसआरपीएफचे कर्मचारी उपस्थित होते.
बाॅक्स
लाेकप्रतिनिधी फिरकेना
अहेरी तालुक्याच्या बहुतांश भागात अद्यापही पक्के रस्ते निर्माण झाले नाही. जे रस्ते १० ते १२ वर्षांपूर्वी तयार झाले, त्यांची दुरुस्ती तेव्हापासून झाली नाही. हा भाग दुर्गम असल्याने नागरिकही तक्रार करीत नाहीत. याचाच फायदा बहुतांश लाेकप्रतिनिधी घेतात. नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्या जाणून घेण्यासाठी ते गावांमध्ये साधे फिरकूनही पाहत नाहीत. प्रशासनही दुर्लक्ष करते, असा आराेप स्थानिक नागरिकांनी याप्रसंगी केला.
100921\10gad_1_10092021_30.jpg
श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविताना सुरक्षा जवान व नागरिक.