लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : दरवर्षी वन विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते. परंतु या रोपट्यांचे संरक्षण व संवर्धन होत नसल्याने लागवडीनंतर वर्षभरातच रोपे नष्ट होतात. अनेकदा मोकाट जनावरे रोपटी फस्त करतात. तर काही रोपटी पाण्याअभावी करपतात. हा प्रकार टाळण्यासाठी कमी पाण्याची आवश्यकता असलेली व जनावरे न खाणारी सीताफळाची रोपटी लावण्याचा संकल्प कोरची पंचायत समितीने केला. या अंतर्गत मोहगाव येथील नर्सरी व परिसरात सीताफळाच्या ५० हजार बियाण्यांचे रोपण बुधवारी करण्यात आले.‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीताफळाच्या बियांचे रोपण करण्यात आले. सीताफळाच्या बिया रूजण्यास कमी पाणी लागतो. गुरेढोरे तसेच वन्य प्राणी सीताफळाच्या रोपट्यांना खात नाही. कोरची तालुक्यातील वातावरण या वृक्षासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे एकाच दिवसात पन्नास हजार सीताफळ बियाणे लावण्यात आली. तालुक्यात सीताफळ बियांची वृक्ष लागवड करणे हा राज्यातील पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे. यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी ग्रामरोजगार सेवक, महिला बचत गट यांच्या सहभागातून व श्रमदानातून वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी कोरची पंचाय समिती सभापती श्रावनकुमार मातलाम, गटविकास अधिकारी देविदास देवरे, उपसभापती सुशीला जमकातन, सदस्य कचरी काटेगे, सदाराम नुरुटी, सहायक गटविकास अधिकारी एस. आर. टिचकुले, विस्तार अधिकारी राजेश फाये, कृषी अधिकारी विनोद पांचाळ, विस्तार अधिकारी निखिल बाबर, राहुल कोपुलवार, आशिष भोयर, दामोधर पटले हजर होते.
५० हजार बियाण्यांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:00 AM
‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीताफळाच्या बियांचे रोपण करण्यात आले. सीताफळाच्या बिया रूजण्यास कमी पाणी लागतो. गुरेढोरे तसेच वन्य प्राणी सीताफळाच्या रोपट्यांना खात नाही.
ठळक मुद्देसीताफळ लागवडीचा प्रयोग : जिल्हा परिषद व कोरची पंचायत समितीचा उपक्रम