शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

झाडीपट्टीतील बहुपयोगी वनस्पती कुडा

By admin | Published: May 27, 2014 12:52 AM

जंगलव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भात अनेक जातीच्या वृक्षांचा समावेश होतो. आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात.

गोपाल लाजूरकर - गडचिरोली

जंगलव्याप्त असलेल्या पूर्व विदर्भात अनेक जातीच्या वृक्षांचा समावेश होतो. आयुर्वेदात महत्वपूर्ण मानल्या जाणार्‍या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. जंगलात आढळणार्‍या अनेक औषधी वनस्पतींविषयीचा आजारांवरील वापर अनभिज्ञ असल्याने जिल्ह्यातील औषधी वनस्पती दुर्लक्षितच आहेत. जिल्ह्यात हिरडा, बेहडा, आवळा या फळवर्गीय वनस्पतींसह कुडा नावाची वनस्पतीही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जंगलात सर्वत्र आढळते. कुडा वनस्पतीचा आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून वापर होतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कुड्यांच्या फुलांची भाजी तयार करून खात असतात. कुडा या वनस्पतीस भाषेनुसार अनेक नावे आहेत. संस्कृतमध्ये या वनस्पतीस कुटज, गुजरातीत इंदरजव, हिंदीत कोरैया तर इंग्रजीत बिटर ओरीएंडर असे अनेक नावे आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच कुड्याच्या झाडांना फुले यायला सुरूवात होते. ५ फुटापासून २० फुटापर्यंत उंच असलेली अनेक झाडे जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. विशेषत: झुडपी जंगलामध्ये कुड्याची झाडे सर्वात जास्त आढळून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांची भाजी म्हणून सर्वात जास्त वापर उन्हाळ्यात नागरिक करीत असतात. प्रत्येक झुडपास फ ांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेली पांढर्‍या रंगाची फुले असलेले गुच्छ येतात. पोळ्याच्या सणादरम्यान कुड्याच्या झाडांना लांबट शेंगा जोडीने येतात. पोळ्याच्या दिवशी कुड्याच्या शेंगांची भाजी खास बैलांना शेतकरी कुड्याच्या पानांच्या पत्रावळीत खाऊ घालतात. त्यामुळे पोळ्याच्या सणाला कुड्याच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुडा ही वनस्पती महाराष्टÑातील कोकण भागासह विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळते. करड्या रंगाच्या सालीचे हे झाड असते. कुड्याच्या बियांची चव कडू व तुरट असते. औषधी म्हणून मुळाची साल व बियांचा सर्वाधिक वापर होतो. रसशास्त्रातही कुड्याला महत्व आहे. पांढर्‍या फुलांमध्ये एक कडू द्रव्य असते. कुड्यांच्या बियातही तेल व कणीदार कडू द्रव्य असते. फेब्रुवारी महिन्यापासून कुड्याच्या झाडांना फुले येण्यास सुरूवात होते त्यामुळे पांढर्‍या फुलांच्या गुच्छांनी झाड बहरले असते. कुड्यात कोनेसीडीन, कोनेशिमाईन, कोनीणाईन, होलेरीन, कुर्चीन, प्रोटीन आदी रासायनिक घटक वृक्षाच्या विविध भागात आढळतात. एकूणच कुड्याचे मुळ, खोड, पान, फुल, फळ आणि बिया बहुपयोगी असतात. बहुगुणी कुड्यामुळे वृक्षाची लागवड शेती, बांध रस्त्याच्या दुतर्फा व बगीच्यांमध्ये केली जाते.