लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी खेळाडूंमध्ये उपजतच चांगली शारीरिक क्षमता आहे. त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत मजल गाठावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले.जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुधवारी स्थानिक पोटेगाव मार्गावरील क्रीडा प्रबोधिनीत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. क्रीडा दिनानिमित्त येथे खो-खोे, कबड्डी, व्हॉलिबॉल, कुस्ती आदी खेळांचे सामने रंगले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालिकेचे मुख्याधिकारी संजय अहोळ होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, शिक्षण विस्तार अधिकारी कोडापे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले, शरद पापडकर, मंगेश देशमुख, सुरेश निंबार्ते, काटेंगे, मंगेश मैदुरकर, यशवंत कुरूडकर, संदीप पेदापल्ली, भालेराव आदी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याधिकारी ओहोळ यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी मदन टापरे, संचालन व आभार तालुका क्रीडा संयोजक खुशाल मस्के यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील १५० खेळाडू उपस्थित होते.खेळाडूंचा गौरवजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सदर कार्यक्रमात शिकाई मार्शल आर्ट या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली खेळाडू एंजल देवकुले, सेजल गद्देवार, अवंती गांगरेड्डीवार, रजत सेलोकर तसेच बॉक्सिंग स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडूू संगीता रूमाले, यशश्री साखरे, हॉकी खेळाडू शिवम धोणे आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 1:27 AM
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी खेळाडूंमध्ये उपजतच चांगली शारीरिक क्षमता आहे. त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरापर्यंत मजल गाठावी, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी केले.
ठळक मुद्देसहायक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : क्रीडा दिनानिमित्त प्रबोधिनीत रंगले विविध सामने