शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

स्टेडियमवर खेळाडूंचे बेहाल

By admin | Published: October 15, 2015 1:33 AM

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत येथील जिल्हा स्टेडियमवर बुधवारपासून शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

सुविधांचा अभाव : क्रीडा विभागाच्या नियोजन शून्यतेचा फटकागडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत येथील जिल्हा स्टेडियमवर बुधवारपासून शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मात्र या मैदानावर खेळाडू विद्यार्थ्यांसाठी पेंडॉल, चेचिंग रूमची व्यवस्था करण्यात आली नाही. पाण्याची व्यवस्था अपुरी होती. डेकोरेशन, लाऊडस्पिकर व प्रथमोपचार व इतर सुविधेअभावी येथे स्पर्धेकरिता आलेल्या जवळपास ५० क्रीडा शिक्षक व ८०० खेळाडूंचे प्रखर उन्हात प्रचंड हाल झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा स्टेडियमवर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षाखालील खेळाडू मुला, मुलींचा समावेश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयामार्फत बाराही तालुक्यातील शाळांना पत्र देऊन सूचित करण्यात आले होते. यापूर्वी तालुकास्तरावर झालेल्या शालेय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या खेळाडूंची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. याकरिता बाराही तालुक्यातील शाळांनी सहभागी विद्यार्थी संख्येनुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला क्रीडा शुल्क अदा केले आहे. १००, २००, ४००, ६००, ८००, १५०० ते ५००० मीटर अंतरापर्यंत दौड स्पर्धा, लांबउडी, उंचउडी, गोळा, भाला, थाळीफेक तसेच रिले दौड स्पर्धेसाठी बाराही तालुक्यातून बुधवारी जवळपास ८०० ते ९०० च्या संख्येत खेळाडू विद्यार्थी गडचिरोलीच्या जिल्हा स्टेडियमवर सकाळी दाखल झाले. सध्या प्रचंड उकाडा असून प्रखर उन्ह राहत असल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर खेळाडूंना बसण्यासाठी पेंडालची व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर पेंडाल, डेकोरेशन, चेचिंग रूम तसेच लाऊड स्पिकर व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. (स्थानिक प्रतिनिधी)खेळाडूंचा प्रचंड भ्रमनिरासजिल्हा परिषद शाळांच्या बिट व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्व सोयीसुविधा खेळाडूंना पुरविल्या जातात. जिल्हास्तरावरही स्टेडियमवर सर्व सोयीसुविधा राहतील, असा खेळाडू विद्यार्थ्यांचा समज होता. मात्र या जिल्हा स्टेडियमवर कोणतीही सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना प्रखर उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. एकूणच खेळाडूंचा पुरता भ्रमनिरास झाला.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा स्टेडियमवर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. मी स्वत: आदल्या दिवशी स्टेडियमवर जाऊन विविध खेळाच्या ग्राऊंडची आखणी करून दिली. बुधवारी क्रीडा उपसंचालकांची बैठक नागपुरात असल्याने आपण सकाळीच गडचिरोलीवरून नागपुरात पोहोचलो. जिल्हा स्टेडियमवर कोणत्या सुविधांचा अभाव होता, याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून घेणार आहोत. पुढील वेळेस शालेय क्रीडा स्पर्धेसाठी परिपूर्ण चांगल्या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करू.- चंद्रदीप शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली