शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

प्लॉट होणार स्वस्त

By admin | Published: May 24, 2014 11:34 PM

शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन शहर विकासाचा नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोन (येलो बेल्ट) म्हणून आरक्षित ठेवण्यात

प्रारूप आराखडा तयार : ८५३.४५ हेक्टरचे निवासी झोन

दिगांबर जवादे - गडचिरोली

शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेऊन शहर विकासाचा नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोन (येलो बेल्ट) म्हणून आरक्षित ठेवण्यात आली आहे. एवढी जागा घर बांधणीसाठी उपलब्ध होणार असल्याने भविष्यात प्लॉटच्या किंमती कमी किंवा स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक नवीन कार्यालये सुरू झाली. या कार्यालयांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी व अधिकारी गडचिरोली शहरात दाखल झाले. त्याचबरोबर या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन रोजगार निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील हजारो कुटुंब गडचिरोली येथे वास्तव्यास आले. त्यामुळे गडचिरोली शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने व्हावा यासाठी जिल्हा निर्मितीनंतर सर्वप्रथम १९९१ साली शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतरही लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या राहण्याची व्यवस्था करण्याबरोबरच शहराचा विकास नियोजनबध्द पध्दतीने करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने २0१४ मध्ये शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये विसापूर मार्ग, रामपूर तुकूम, देवापूर, लांजेडा वार्ड, सोनापूर आदी परिसरातील ८५३.४५ हेक्टर जागा निवासी झोनसाठी आरक्षीत करण्यात आली आहे. नगर परिषद प्रशासनाने या निवासी झोनला मान्यता दिली आहे. आरक्षीत केलेल्या जागेबद्दलचे आक्षेप वृत्तपत्रात ११ मार्च २0१४ रोजी जाहिरात देऊन मागविण्यात आले होते. जवळपास १२५ नागरिकांनी आक्षेप नोंदविले आहेत. या आक्षेपांवर सुनावणी करण्यासाठी प्लॅनिंग कमिटीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये नगर परिषेच्या स्थायी समितीचे तीन सदस्य व शासनाचे चार तज्ज्ञ राहणार आहेत. आक्षेपांबद्दल निर्णय घेऊन नगर परिषदेला सादर करणार आहे. सर्वसाधरण सभेमध्ये याबद्दलचा अंतिम ठराव घेतल्यानंतर अंतिम प्रारूप आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे. शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर सदर जागा घर बांधणीसाठी उपलब्ध होणार आहे. यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

गडचिरोली शहराच्या उत्तरेला कठाणी नदी, पूर्व व दक्षिणेला झुडपी जंगल व पश्‍चिमेला ओलीताखालील शेती असल्याने शहर विस्तारावर फार मोठय़ा र्मयादा पडल्या होत्या. एवढेच नाही तर २0 वर्षाचा कालावधी लोटूनही शहर विकासाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला नसल्याने आहे त्याच जागेचे प्लॉट पाडण्यात येत होते. मागील काही दिवसापासून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मागणीच्या तुलनेत प्लॉट अत्यंत कमी उपलब्ध असल्याने प्लॉट विक्रेते मन मानेल तेवढी किंमत आकारत होते. किरायाच्या घरात राहून आयुष्य काढलेले जोडपे शेवटी त्रस्त होऊन कितीही किंमत मोजून प्लॉट खरेदी करीत होते.

शहर विकासाच्या प्रारूप आराखड्याला शासनाने मंजूरी दिल्यानंतर ८५३.४५ हेक्टर जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध होणार आहे. एवढी जागा उलपब्ध झाल्यानंतर प्लॉटच्या किंमती आपोआप कमी किंवा स्थिर राहण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. यासाठी शहर विकासाचा प्रारूप आराखडा मंजूर होईपर्यंत एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.