शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

समायोजनाचा मुद्दा गाजला

By admin | Published: June 19, 2014 12:05 AM

अतिरिक्त ठरलेल्या ४४५ प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि. प. च्या शिक्षण विभागाच्यावतीने २० व २१ जून रोजी घेण्यात येणार होती. यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन करण्यात

जि. प. ची सर्वसाधारण सभा : शिक्षक समायोजन प्रक्रिया लांबणीवरगडचिरोली : अतिरिक्त ठरलेल्या ४४५ प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जि. प. च्या शिक्षण विभागाच्यावतीने २० व २१ जून रोजी घेण्यात येणार होती. यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन करण्यात येणाऱ्या शिक्षकांची यादीही तयार करण्यात आली होती. मात्र सदर यादी चुकीची बनविण्यात आली असून सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याचा मुद्दा जि. प. सदस्य विश्वास भोवते यांनी आज बुधवारच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. जिल्ह्यात १७३ उच्च श्रेणी मुख्याध्यापक व २७२ प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त ठरलेल्या ४४ मुख्याध्यापकांना पदवीधर शिक्षक म्हणून तर १२९ शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र सदर निर्णय हा मुख्याध्यापकांवर अन्यायकारक असल्याची बाब जि. प. सदस्य विश्वास भोवते यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. यावर शिक्षण उपसंचालकाचे मार्गदर्शन घेऊन योग्यरित्या समायोजन करण्यात येईल, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सभागृहात दिले. याला सभागृहाने मान्यता दिली. त्यामुळे आता नव्याने यादी तयार होणार असल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांनी आरोग्य विभागाची माहिती जि. प. प्रशासनाकडे पत्राद्वारे मागितली होती. मात्र त्यांना माहिती मिळाली नाही. त्यानंतर माहितीच्या अधिकारात त्यांनी माहिती मागितली. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्याशी चर्चाही केली. मात्र माहिती मिळाली नाही. माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा मुद्दा जि. प. सदस्य पद्माकर मानकर यांनी सभागृहात उपस्थित केला. याला कृषी सभापती अतुल गण्यारपवार व जि. प. सदस्य विश्वास भोवते यांनी दुजोरा दिला. जि. प. चा २०१४-१५ यावर्षाचा मूळ अर्थसंकल्प अवलोकन व मंजुरीसाठी सभागृहात सादर करण्यात आला. मात्र वेळेवर या अंदाजपत्रकावर चर्चा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने विशेष सभा बोलावून अर्थसंकल्पलाही मान्यता देण्याचा ठराव पारीत झाला. (स्थानिक प्रतिनिधी)