महेश पाटील यांचे प्रतिपादन : पॅराडाईज स्कूलमध्ये कार्यक्रम आरमोरी : पोलिसांची नेमणूक जनता व समाजाच्या संरक्षणासाठी झाली आहे. पोलीस दल संरक्षणासाठी नेहमी तत्पर राहत असल्याने समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन आरमोरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश पाटील यांनी केले. पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी येथे पोलीस दल स्थापनेनिमित्त रेझिंग डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाला विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, किरण डाखोळे, मुख्याध्यापिका सुजाता मेहर, सहायक पोलीस उपनिरीक्षक कुंभारे, पोलीस हवालदार राऊत, एनपीसी म्हशाखेत्री उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शस्त्रांबद्दल माहिती देण्यात आली. पुढे मार्गदर्शन करताना महेश पाटील म्हणाले, पोलीस हा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या संरक्षणासाठी नेमण्यात आला आहे. पोलीस दल स्वत:चे काम अतिशय चोखपणे करीत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पोलिसांसमोर तक्रार सादर करावी. पोलीस मित्र अॅप तयार करण्यात आला असून या अॅपमुळे पोलीस व जनता यांच्यामध्ये जवळीक निर्माण होण्यास मदत झाली आहे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नितुराणी मालाकर, रतनराज खोब्रागडे, होमराज माकडे, प्रभा रामटेके, मोनाली त्रिकोलवार, शारदा मेंघरे, निर्मला नांदेकर, झासी इंदूरकर, श्वेता खापर्डे, अनिता दुमाने, यशोदा डाखोळे, कुमता घोडेस्वार, नईमा पठाण, शारदा हर्षे, प्रशांत कतरे, मीनाज शेख, किरण रामटेके, देब्रत मंडल, माधुरी वनवे, सिंधू म्हशाखेत्री, शालू बारापात्रे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पोलीस दल मदतीसाठी तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2017 2:17 AM