भाऊबीजेचे औचित्य : जिमलगट्टाच्या उपपोलीस ठाण्यात कार्यक्रमजिमलगट्टा : येथील उपपोलीस ठाण्यात भाऊबीज निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य राखीव दलाच्या वतीने महिलांना भेटवस्तंूंचे वितरण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात महिला मंडळाच्या अध्यक्ष डाळिंबीबाई वैैद्य यांनी सर्वप्रथम पोलीस निरीक्षक डी. के. छोरमले यांची भाऊबीजेनिमित्त ओवाळणी केली. त्यानंतर इतर महिलांनीही पोलीस अधिकारी व जवानांची ओवाळणी केली. पोलीस विभागाच्या वतीने महिलांना साड्या भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. सध्या विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेतली आहे. दुर्गम भागात वास्तव्य आहे म्हणून स्वत:ला कमी न लेखता आत्मविश्वासाने विविध क्षेत्रात भरारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक डी. के. छोरमले यांनी केले. या कार्यक्रमाला वाचक फौजदार वांगणेकर, प्रभारी अधिकारी गायकवाड, पोलीस हवालदार, पुलीराजू कोमनवार, स्वामी दासरी व जवान उपस्थित होते. (वार्ताहर)
पोलिसांकडून महिलांना भेटवस्तू
By admin | Published: November 05, 2016 2:36 AM