खांदलात जनजागरण मेळावा : नानासाहेब कदम यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कराजाराम खांदला : नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन प्रभारी पोलीस निरिक्षक नानासाहेब कदम यांनी केले. राजाराम पोलीस स्टेशनच्या वतीने खांदला येथील ग्रामपंचायतच्या पटांगणात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य भाष्कर तलांडे तर प्रमुख अतिथी म्हणून खांदला ग्रामपंचायतीच्या सरपंच शकुंतला कुळमेथे, राजाराम ग्रामपंचायतचे सरपंच ज्योती जुमनाके, वन विभागाचे एस. चकीनारपवार, करेवार, राहूल कंबगौणीवार, चंद्रशेखर कोडापे, माधव कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी शासनाच्या मार्फतीने अनेक योजना राबविल्या जातात. मात्र दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक योजनांची माहिती नाही. काही नागरिकांना योजनांची माहिती आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र त्यांच्याकडे नाही. कागदपत्र काढण्यासाठी संबंधित गावचे तलाठी ग्रामसेवक यांची मदत घ्यावी. गडचिरोली जिल्ह्यातील भौगोलिक व आर्थिक परिस्थिती इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळी आहे. त्यामुळे पोलीस विभाग नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीही प्राधान्य देते, असे प्रतिपादन प्रभारी ठाणेदार नानासाहेब कदम यांनी केले. जनजागरण मेळाव्याला पोलीस निरिक्षक लावणे, विटेकरी यांच्यासह खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली आदी गावातील नागरिक उपस्थित होते. जनजागरण मेळाव्यादरम्यान ग्रामीण भागातील युवकांना व्हॉलिबॉल व बॅटचे वाटप करण्यात आले. जनजागरण मेळावा यशस्वी करण्यासाठी राजाराम पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
समस्या सोडविण्यास पोलीस तत्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:43 AM