आॅनलाईन लोकमतआलापल्ली : चंद्रपूर जिल्ह्याच्या आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थिनी स्वगावाकडे परतण्यासाठी आलापल्लीपर्यंत पोहोचल्या. मात्र त्यांच्याकडे प्रवासासाठी पैैसे नव्हते. या मुलींना वाहतुक पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी मदत करून त्यांच्या गावाकडे सुखरूप पोहोचवून दिले. यातून त्यांनी माणुसकीचा परिचय दिला.चंद्रपूर जिल्ह्याच्या धाबा येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना दिवाळीच्या सुट्या लागल्याने त्या स्वगावी छल्लेवाडा, कमलापूर येथे जाण्यासाठी सायंकाळी आलापल्ली पोहोचल्या. मात्र त्यांना गावापर्यत जाण्याकरिता पैसे व वाहन नव्हते. आलापल्लीत पाऊस सुरू असल्याने या मुली येथील अशोक आईचवार यांच्या दुकानात जवळ थांबून होत्या. वाहतूक पोलीस नियंत्रक व उडान फॉऊन्डेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार यांनी त्यांची विचारपूस केली व त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था केली. सकाळी आलापल्लीत नास्ता व चायची व्यवस्था करून या आठ मुलींना मंथनवार यांनी वाहनाची व्यवस्था करुन त्याच्या गावाला सुखरुप पोहचवून दिले.
पोलिसाने दाखविली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:05 PM
चंद्रपूर जिल्ह्याच्या आश्रमशाळेत शिकणाºया विद्यार्थिनी स्वगावाकडे परतण्यासाठी आलापल्लीपर्यंत पोहोचल्या. मात्र त्यांच्याकडे प्रवासासाठी पैैसे नव्हते. या मुलींना वाहतुक पोलीस हवालदार संतोष मंथनवार यांनी मदत करून त्यांच्या गावाकडे सुखरूप पोहोचवून दिले.
ठळक मुद्देआठ शाळकरी मुलींना मदतगावाकडे सुखरूप पोहोचल्या