शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

पोलिसांचे कार्य प्रशंसनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:20 AM

केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली पोलीस दलाचे जवान या भागाची नक्षलग्रस्त म्हणून असणारी ओळख पुसण्याचे काम करीत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्र्यांचे प्रतिपादन : भामरागड येथे महिलांना शिलाई मशीनचे वाटप

ऑनलाईन लोकमतभामरागड : केंद्रीय राखीव पोलीस दल आणि गडचिरोली पोलीस दलाचे जवान या भागाची नक्षलग्रस्त म्हणून असणारी ओळख पुसण्याचे काम करीत आहेत. सोबतच नागरिकांना उपजीविकेसाठी सहाय्य करतात. हे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात सीआरपीएफ ३७ बटालियनतर्फे नागरी कृती कार्यक्रमांतर्गत गरजू, गरीब महिलांना शिलाई मशीनचे वाटप ना. अहीर यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, खरे तर या जवानांनी देशाच्या सीमेवर असायला हवे. मात्र नक्षलवाद संपवण्यासाठी त्यांना इतक्या दुर्गम भागात काम करावे लागत आहे. जवानांनी नक्षलवाद संपवण्यासाठी आतापर्यंत उत्कृष्ट कार्य केले, असेही ते म्हणाले.नागरी कृती कार्यक्रमांतर्गत ४२ महिलांना तीन महिन्यांचे शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी ४० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सोबतच नववी व दहावी उत्तीर्ण झालेल्या ४० विद्यार्थिनींना संगणक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.या कार्यक्रमास खा. अशोक नेते, अतिरिक्त पोलीस महासंचालक डी.कनकरत्नम, सीआरपीएफचे आयजी राजकुमार, डीआयजी टी.शेखर, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ए.राजा, अतिरिक्त जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, तहसीलदार कैैलास अंडिल, संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार, प्रकल्प अधिकारी धीरज मोरे, कृषी अधिकारी दिलीप राऊत, भाजपचे प्रकाश गेडाम, सुनील बिश्वास, ३७ सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट श्रीराम मीणा, एसडीपीओ तानाजी बरडे, ९ बटालियनचे कमांडंट रवींद्र भगत, द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर