शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

राजकीय नेत्यांनी विकासासाठी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 6:00 AM

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन : देसाईगंजमध्ये अनेक संघटना व संस्थांकडून सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : राज्यात आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षानुवर्ष पुरेल, अशी एवढी खनिज संपत्ती आहे. लोहखनिजावर आधारीत सुरजागड प्रकल्प सुरू झाला तर जिल्ह्यात मोठमोठे उद्योग सुरू होतील. जिल्ह्यातील बेकारी पूर्णपणे दूर होईल. मात्र त्यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकजूट होणे काळाची गरज आहे, अशी भावना विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.देसाईगंज जवळील कुरूड येथे मॉ शारदा फुड प्रॉडक्ट राईस इंडस्ट्रिजच्या प्रांगणात आयोजित उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीपसाई जग्यासी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, सीआरपीएफचे कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, डॉ. प्रमोद साळवे, सुधीर भातकुलकर, अ‍ॅड. संजय गुरू, नगरसेवक हरीष मोटवानी, सुधीर रामानी, राम कांबळे, सतिश विधाते, डॉ. अविनाश शिवणकर, त्रिचंद दासवानी, निलोफर शेख, नलिनी माने आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना विदर्भाच्या प्रश्नांची जाणीव असून हे प्रश्न सोडविण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत. येत्या पाच वर्षात विदर्भाचा विकास नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून पाठपुरावा करण्याची गरज आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ ही बाब राजकीय नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे. उद्योग निर्मितीसाठी दळणवळणाची साधने व मार्ग महत्त्वाचे आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न रखडला आहे. रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साधन सामग्री आहे. या साधनसामग्रीवर आधारीत उद्योग निर्माण करण्यास फार मोठा वाव आहे. वनांवर आधारीत उद्योग निर्मिती करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू. उद्योग निर्माण झाल्यास बेरोजगाराची समस्या दूर होऊन नागरिकांचा राहणीमान आपोआप उंचावेल. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वप्रथम रोजगाराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पटोले यांनी केले.अनेक जणांकडून निवेदन सादरसत्कार समारंभाला जाण्यापूर्वी नाना पटोले यांनी देसाईगंज येथील गुरूदेव सेवाश्रमाला भेट दिली. यावेळी गुरूदेव प्रेमींनी सेवाश्रमाच्या विकासासाठी निधी द्यावा, असे निवेदन दिले. निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पटोले यांनी दिले. त्यानंतर देसाईगंज येथील गुरूद्वाराला भेट देऊन गुरूग्रंथ साहेबाचे दर्शन घेतले. शिख समाजातील नागरिकांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर हुतात्मा स्मारक येथे देसाईगंज येथील पत्रकारांनी निवेदन देऊन पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, तसेच पत्रकारांना पेन्शन लागू करावी, असे निवेदन दिले. कंत्राटी तत्वावरकाम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित करण्याबाबतचे निवेदन दिले. पटोले यांनी देसाईगंज महोत्सवालाही भेट दिली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले