गाेंडवाना विद्यापीठातील पदव्युत्तर इतिहास विभागाद्वारे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके व्याख्यान मालेच्या तिसऱ्या सत्रात ते बाेलत हाेते.
कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. रश्मी बंड, नागपूर विद्यापीठाच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, डॉ. श्याम कोरेटी, डॉ. मीता रामटेके तसेच महाराष्ट्र राज्याचे जैव विविधता मंडळाचे सदस्य डॉ. अमित सेठिया व विविध विद्यापीठांतील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले.
प्रा. भुक्या भांग्या पुढे म्हणाले, मध्ययुगीन व ब्रिटिश काळात गोंड आदिवासींचे विविध स्तरावर सार्वभौम अस्तित्व होते. विविध स्तरावरील सार्वभौमत्व नष्ट करून एकजिनसी केंद्रीभूत सांस्कृतिक सत्ता उभी करण्याचे काम ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी केले. ब्रिटिश काळात गोंड आदिवासी आधुनिक राजकीय जमात म्हणून उदयास आली होती. वर्तमान काळात भारतात व्यावसायिक व लोक इतिहास या दोन पध्दतीचा इतिहास अस्तित्वात आहे. यामध्ये पूर्वग्रहविरहित इतिहासाची पुनर्मांडणी करण्याकरिता मौखिक संस्कृतीच्या आधारे चिकित्सक इतिहास समोर आणणे आवश्यक आहे. याकरिता नवीन पध्दती शास्त्राचा अवलंब करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. नंदकिशोर मने तर आभार डॉ. संतोष सुरडकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. नरेश मडावी, डॉ. प्रफुल नांदे यांनी सहकार्य केले.