काेरची : तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमाेजणी २२ जानेवारीला सकाळी १० वाजतापासून तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय भवनात हाेणार आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्यासह चार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मतमाेजणीची तयारी पूर्ण झाली असून यासाठी ४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील १९४ उमेदवारांचे भाग्य १२ फेऱ्यांच्या माध्यमातून खुलणार आहे.
सकाळी १० वाजता मतमाेजणीला सुरूवात झाल्यानंतर जवळपास तीन तास ही प्रक्रिया सुरू राहील. सुरूवातीला टपाली मतदानाची माेजणी हाेईल. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतमाेजणीला सुरूवात हाेईल. तालुक्यातील २९ ग्रामपंचायतपैकी १८ ग्रामपंचायतीच्या २२९ जागांसाठी निवडणूक हाेणार हाेती. मात्र चार ग्रामपंचायतमधील ३५ उमेदवार बिनविराेध आल्याने १५ जानेवारीला १४ ग्रामपंचायतीच्या १९४ जागांसाठी पहिल्या टप्प्यात ४० प्रभागातून विविध संवर्गातील ९७ पुरूष व ९७ स्त्री उमेदवार रिंगणात हाेते. १३ हजार ७७४ मतदारांपैकी १० हजार ४१८ मतदारांनी निवडणुकीत मतदान केले हाेते. यामध्ये ५ हजार २३५ पुरूष तर ५ हजार १८३ स्त्रियांचा समावेश हाेता.