जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जलसंधारण विभागाकडून ७० लाख रुपयांचा निधी पूलवजा बंधारा निर्मितीसाठी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम हाेणार आहे. मिचगुडा नाल्यावर बंधारा बांधकामाचे भूमिपूजन अहेरीचे पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते झाले. मिचगुडा येथील नाल्यावर मागील अनेक वर्षांपासून पुलाचे बांधकाम न झाल्याने येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत हाेता. येथील गावकऱ्यांनी ही समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष कंकडालवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता कंकडालवार यांनी स्वतः नाल्यावर जाऊन पाहणी केली होती. बंधारा बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार बंधारा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याची साठवणूक होऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल. बंधारा भूमिपूजनप्रसंगी जलसंधारण उपविभागीय अभियंता इंगोले, येरमनारच्या सरपंच संध्या मडावी, उपसरपंच विजय आत्राम, डोलू मडावी, वाघा तलांडी, अहेरीचे पेसा समन्वयक एस. कोठारी, दशरथ रामटेके, प्रभाकर झाडे, कैलाश झाडे, लक्ष्मण झाडे, करपा तलांडी, लालू आत्राम, बंडू गावडे, सोमा आत्राम उपस्थित होते.
पूलवजा बंधाऱ्यामुळे सिंचनाची साेय हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:06 AM