१९०७ मध्ये इंग्रजांनी सदर विश्रामगृह बांधले. चुणा व विटांनी बांधलेल्या या विश्रामगृहाचे छप्पर पूर्वी गवताचे होते. नंतरच्या काळात गवत काढून त्यावर कवेलू अंथरण्यात आले. ब्रिटिश राजवटीत अनेक अधिकारी या विश्रामगृहाचा वापर करीत होते. तसेच श्रीमंत धर्मराव महाराज (द्वितीय), राजे भगवंतराव महाराज, राजे विश्वेश्वरराव महाराज हे मुलचेरा परिसरात दौऱ्यावर आल्यास या विश्रामगृहात थांबत होते. मुलचेरा या तालुकास्थळी या विश्रामगृहाशिवाय दुसरे विश्रामगृह नाही. त्यामुळे या विश्रामगृहाची देखभाल करणे आवश्यक आहे. विश्रामगृहात दोरीने ओढायचे पंखे आहेत. बाहेरच्या बाजूने पंख्याची दोरी ओढण्याची सोय आहे. विश्रामगृहात मेज आरसा, ड्रेसिंग टेबल आदी ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वस्तू ठेवल्या आहेत. सदर वस्तू अतिशय दुर्मिळ असल्याने त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या पेडिगुड्डम वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे या विभागाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. विश्रामगृहाच्या सभोवताल फुलांची झाडे आहेत. तसेच समोर बगीचा आहे. मात्र, या झाडांना पाणी टाकले जात नसल्याने ते करण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील विश्रामगृह हे ऐतिहासिक वास्तू असल्याने याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
देखभालीअभावी ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:38 AM