प्राप्त माहितीनुसार, ‘ग्रामपंचायत आलापल्ली’ या नावाने एक व्हाॅट्स-ॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर अंदाजे २५० वर सदस्य आहेत. यात आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, प्रभारी ग्रामसेवक, अनेक राजकीय पक्षाचे नेते तथा कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश आहे. या अश्लील व्हिडिओमुळे आलापल्ली ग्रामपंचायतीची बदनामी होऊन चुकीचा संदेश समाजात पसरत असल्याचे सांगत तो व्हिडीओ टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी शेख यांनी तक्रारीतून केली आहे. अहेरी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
(बॉक्स)
आठ चित्रफितींनी उडाली धांदल
या ग्रुपच्या माध्यमातून आलापल्ली येथील विकास कामे, त्यांची अंमलबजावणी व विविध योजनांबाबतची माहिती टाकण्यात येते. अशात एका सदस्याने एकामागून एक तब्बल ८ अश्लील व्हिडिओ टाकले. यामुळे ग्रुपमधील सदस्यांसह महिला सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. हा प्रकार संबंधित सदस्याने मुद्दाम करून सामाजिक वातावरण दूषित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु ते व्हिडिओ अनावधानाने त्या ग्रुपवर पाठविले गेल्याची कबुली देत त्या ग्रुप सदस्याने माफी मागितली.