लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ओबीसींची जनगणना, केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय आदीसह ओबीसींच्या विविध मागण्या व प्रश्नांसंदर्भांत २० डिसेंबर रोजी शुक्रवारला विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसींच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, समन्वयक अशोक जिवतोडे, युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष श्यामभाऊ लेडे, महिला महासंघाच्या अध्यक्ष सुषमा भड, कल्पना मानकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, रमेश ताजने, ओमदास तुरानकर आदी उपस्थित होते. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावू, या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचा सरकारच्या वतीने प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही नाना पटोले यांनी यावेळी दिली.सदर बैठकीत ओबीसींच्या विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये २०२१ मध्ये होणाºया राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जनगणना करावी, राज्याप्रमाणे केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी, देशात व राज्यात ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम ठेवण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.आंबेडकर स्वाधार योजना लागू करावी, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास निधी वळता करावा आदी मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी विदर्भातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी हजर होते.
ओबीसींच्या विविध प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:00 AM
या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, समन्वयक अशोक जिवतोडे, युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष श्यामभाऊ लेडे, महिला महासंघाच्या अध्यक्ष सुषमा भड, कल्पना मानकर, उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, शरदराव वानखेडे, रमेश ताजने, ओमदास तुरानकर आदी उपस्थित होते.
ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षांची ग्वाही । मुख्यमंत्र्यांसोबत समाजाची बैठक लावणार