गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यासह संपूर्ण देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाचा प्रारंभ झाला. त्यातल्या त्यात काेराेना पाॅझिटिव्ह रूग्ण कमी हाेत असल्याने नागरिकांमधील काेराेना संसर्गाची भीती कमी झाली आहे. मात्र मकरसंक्रांतीच्या सणापासून महिला वाण वाटण्याच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. शिवाय मास्कचा वापर फार कमी झाला आहे. अशावेळी काेराेनाचा संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मार्च २०२० पासून गडचिराेली जिल्ह्यात काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करण्यात आले. दरम्यान एप्रिल महिन्यात कुरखेडा तालुक्यात एकाचवेळी पाच पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून आले हाेते. तेव्हापासून प्रशासनाने कठाेर पावले उचलली. प्रशासनाच्या खबरदारीमुळे जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आला. आता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात १० ते १२, १५ अशा संख्येने पाॅझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. मात्र मकरसंक्रांतीनिमित्त आता महिलांचे मेळावे आयाेजित केले जात आहेत. शिवाय सामूहिक व वैयक्तिक वाण वितरणाच्या कार्यक्रमात महिला माेठ्या संख्येने सहभागी हाेत आहे. दरम्यान आनंदाच्या उत्सवात महिलांकडून काेविडच्या नियमांना बगल दिली जात आहे. त्यामुळे संसर्ग हाेऊ शकताे.
बाॅक्स ....
लस आली तरी धाेका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात काेणी आले असताना ताेंडाला मास्क लावायला विसरू नका. साेबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.