मुलचेरा तालुक्यातील लभाणतांडा या गावात रताळाची शेती केली जाते. रताळाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रताळाची शेती सोडली होती. मात्र मागील सहा वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत रताळाच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रताळात नैसर्गिक साखर राहते. बद्धकोष्ट व कोलोन कन्सरला रताळ प्रतिबंध करते. यामध्ये विटॅमिन ए, डी, पोटॅशिअम, बी-६, बिटा कॅरोटीन, मॅग्नेशिअम व फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात राहते.
रताळाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 2:10 AM