सालमारा-कनेरी या मार्गाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी झाले. पाच वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेत भर पडली. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनासह अवजड वाहतूक होत असते. या रस्त्याच्या एका ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांच्या दृष्टीस सदर भगदाड येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वर्षभर मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली. त्यामुळे सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी अनेकदा नागरिकांनी केली. परंतु या मागणीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्षच झाले. सालमारा-कनेरी मार्ग अरूंद असल्याने सदर मार्ग रूंदीकरणाच्याही प्रतीक्षेत आहेत. रस्ते अरूंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. खड्ड्यांमुळेही त्रास होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खड्ड्यांमुळे सालमारा-कनेरी मार्गावरील प्रवास खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:33 AM