नागरिकांकडून पाणीपट्टीची दर महिन्याला वसुली वेळेवर होत नाही. त्यामुळे विजेचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध राहत नाही. परिणामी दरवर्षी मार्च महिन्यात जलशुद्धीकरण केंद्राची वीज कापली जाते. जल शुद्धीकरण केंद्राकडे २ लाख ८० हजार रुपये विजेचे बिल थकीत आहे. तसेच ग्रामपंचायत बोरीकडून १२ लाख ८४ हजार २५० रुपये, चुटुगुंटा ग्रामपंचायतकडे ६ लाख ८२ हजार रुपये, लगाम ग्रामपंचायतकडे ५ लाख ८८ हजार २२० रुपये तर शांतीग्राम ग्रामपंचायतकडे २ लाख ३४ हजार ६५० रुपये असे एकूण २७ लाख ७८ हजार ३२० रूपये एवढी पाणीपट्टी नागरिकांकडून वसूल हाेणे शिल्लक आहे.
बॉक्स
तर नळ योजना बंद केल्या जाईल
लगाम, चुटुगुंटा,शांतीग्राम व बोरी या चार ग्रामपंचायत अंतर्गत सात गावातील ५७८ ग्राहकांकडे २७ लाख ७८ हजार ३२० रूपये एवढी पाणीपट्टी थकबाकी आहे. नळ कनेक्शनचे दर महिन्याला ग्रामपंचायतने वसुली करून जि. प. ला पाठविली नाही तर भविष्यात लगाम बोरीची प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद केल्या जाईल असा इशारा गडचिरोली जि. प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता विनोद उद्धरवार यांनी दिला आहे.