कमलापूर येथे जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जाताे. हे अंतर १४ किमी आहे. वीजलाईन घनदाट जंगलातून गेली असल्याने जरासा वादळवारा सुटला तरी वीज पुरवठा खंडित हाेताे. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागताे. कमलापूर येथे विद्युत उपकेंद्र मंजूर व्हावे यासाठी शासनस्तरावर निवेदन देण्यात आले व आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे मागणीची दखल घेत मागील वर्षी विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले; परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही या ठिकाणी विद्युत उपकेंद्र उभारण्यात आले नाही. स्थानिक लाेकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मंजूर असलेले ३३ केव्ही उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कमलापूर येथे विजेचा लपंडाव वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:26 AM