मुरखळा येथे अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. थोडा पाऊस किंवा वारा आला तरी विद्युत पुरवठा खंडित होताे. अनेकदा रात्रभर विद्युत पुरवठा खंडित राहताे. नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागते. तसेच विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने मोबाइल बंद राहतात. त्यामुळे ऑनलाइन कामे करण्यास मोठी अडचण येते. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्युत पुरवठा खंडित हाेण्याचा फटका नागरिकांसह विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. निवेदन देताना मुरलीधर बुरे, किशोर बोधलकर, संजय बुरे, भास्कर बुरे, सुरेश बुरे, लालाजी बुरांडे, अंतराम पवार, श्रीकृष्ण बोबाटे, योगराज बुरे, संदीप गटलेवार, संजय बुरे, सोमनाथ मेश्राम, शंकर सोमनकर, कालिदास नैताम उपस्थित होते.
100921\0227img-20210910-wa0228.jpg
विधृत निवेदन फोटो