लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.धानोरा येथे ३३ केव्ही उपकेंद्र आहे. येथे सिंगल फेज लाईन असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुरूस्तीशिवाय पर्याय राहत नाही. आधीच जंगलव्याप्त तालुका असल्याने विद्युत लाईन जंगलातून गेली आहे. जराशी हवा अथवा वादळ आल्यास विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेकदा झाडाच्या फांद्या तारांवर कोसळतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. मागील पंधरवड्यापासून शहरासह तालुक्यात वीज समस्या वाढली आहे. दिवसभरात अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. १४ व १५ जून रोजी जंगलातील वठलेले झाड अज्ञात इसमांनी बुडापासून जाळल्याने संपूर्ण झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या दिवशी वीज रात्री ९ वाजता खंडित झाल्यानंतर पहाटे ४ वाजता दुरूस्तीनंतर सुरू झाली. १९ जून रोजी झाडाच्या फांद्या छाटणे व दुरूस्तीकरिता सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. तसेच याच दरम्यान दिवस व रात्रीच्या सुमारास जवळपास ८ ते १० वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्युतवर चालणाऱ्या उपकरणांवर परिणाम झाला. पंधरवड्यापासून ही समस्या वाढली असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.अनेक कामांवर परिणामकाही दिवसांपूर्वी बारावी व दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कामाकरिता इंटरनेट कॅफेवर अथवा अन्य ठिकाणी कामाकरिता जावे लागते. तसेच खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच बँकेचे व्यवहार करावे लागतात. त्यामुळे वीज पुरवठा नियमित असणे आवश्यक आहे. परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी व नागरिकही त्रस्त झाले आहेत.
पंधरवड्यापासून वीज समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:53 PM
दुर्गम व अतिदुर्गम तथा संवेदनशील तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा शहरासह ग्रामीण भागात पंधरवड्यापासून वीज समस्या आहे. दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देवीज पुरवठा वारंवार खंडित : धानोरा शहर व तालुक्यातील नागरिक त्रस्त