वैरागड: आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील वनमाळी गुरनुले यांच्या शेताजवळ असलेला विद्युत राेहित्र मागील एक महिन्यापासून बंद असल्याने या विद्युत राेहित्रावरून विद्युत जाेडणी असलेले दहा कृषिपंपांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. पाण्याअभावी धान पीक करपू लागले आहेत.
दोन हजार लोकवस्ती असलेल्या मोहझरी या गावात नेहमीच अनियमित वीजपुरवठा हाेते. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तरीसुद्धा गावकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. खरीपाचा हंगाम असताना व धान पिकासाठी पाण्याची आवश्यकता असताना मोहझरी येथील वनमाळी गुरनुले यांच्या शेताजवळ असलेला ट्रान्सफार्मर मागील एक महिन्यापासून बंद आहे या ट्रान्सफार्मरवरून लगतच्या या दहा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला विद्युत जाेडणी आहे. राेहित्र बंद असल्याने त्या दहा शेतकऱ्यांचे कृषिपंप देखील बंद आहेत. पाण्याऐवजी त्यामुळे शेतकऱ्यांचे धान पीक करपू लागले आहे.
बाॅक्स
कनिष्ठ म्हणतात वरिष्ठांना कळविले
नादुरुस्त विद्युत राेहित्राबाबत येथे कार्यरत वायरमन यांच्याकडे तक्रार केली असता रोहित्रात माेठा बिघाड असल्याने वरिष्ठांना याबाबत कळविले आहे, असे सांगितले. पण अजूनपर्यंत हा ट्रान्सफार्मर दुरुस्त झाला नाही. मागील दहा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकाला पाणी देणे आवश्यक झाले असताना रोहित्र बंद आहे. पाणी न दिल्यास धान पीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोहित्र लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी मोहझरीचे माजी सरपंच शालिकराम मोहुर्ले यांनी केली आहे.
130821\img-20210812-wa0035.jpg
मोहझरी येथील नादुरुस्त विद्युत जंनत्री