लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वीज आकड्यांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने रात्रीच्या सुमारास जंगल परिसराला लागून असलेल्या शेतांवर गस्त घालण्याची मोहीम मागील पाच दिवसांपासून सुरू केली आहे.जंगलच्या जवळ असलेल्या शेतांचे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या वन्यजीवांना शेतात येण्याला प्रतिबंध घालण्यासाठी काही शेतकरी शेताच्या सभोवताल विद्युत प्रवाह सोडून ठेवतात. या विद्युत प्रवाहामुळे गडचिरोली जिल्ह्यात मागील १५ दिवसात एक वाघीण व शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारच्या अनुचित घटनांवर आळा घालण्यासाठी रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाºयांनी गस्त घालावी व आकड्यांचा शोध घ्यावा, असे निर्देश राज्य शासनाने वन विभाग व वीज विभागाला दिले आहेत. त्यामुळे वन विभाग व वीज विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. सदर पथक त्यांच्या परिसरात रात्री गस्त घालून आकड्यांचा शोध घेत आहेत. बेकायदेशीरपणे विजेचा प्रवाह सोडला असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकºयावर कारवाई केली जात आहे. पथक गस्त घालत असल्याची माहिती शेतकºयांना होताच आकडे टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.रात्रीच्या गस्तीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम हे नियंत्रण ठेवून आहेत.रबी हंगामात वन्यजीवांची शेतांकडे धावआॅक्टोबर महिन्यापासून रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात होते. या कालावधीत जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटण्यास सुरूवात होते. पाण्याअभावी गवतही कमी होते. त्यामुळे वन्यजीव पाणी व चाºयाच्या शोधात जंगलाजवळ असलेल्या शेतात जातात. रबी हंगामाचे सर्वाधिक नुकसान वन्यजीवांकडून होत असल्याने या कालावधीत काही शेतकरी मचान उभारून स्वत: रात्री उपस्थित राहून वन्यजीवांपासून पिकांचे रक्षण करतात. तर काही शेतकरी शेताच्या सभोवताल वीज प्रवाह सुरू करण्याचा सोपा मात्र धोकादायक मार्ग अवलंबतात. वन विभागाने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आकडे टाकण्यास प्रतिबंध बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रात्रीच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांची गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:31 AM
वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या सभोवताल वीज तारेचा प्रवाह सोडण्याचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव ठार होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ठळक मुद्देआकड्यांचा घेत आहेत शोध : अवैध वीज पुरवठा घेणाऱ्यांवर कारवाई होणार