शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

सायकल दाैड स्पर्धेत प्रवीण व साहिल अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:37 AM

गडचिराेली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गडचिराेली येथे शनिवार २३ जानेवारीला सायकल दाैड स्पर्धा दाेन गटांत ...

गडचिराेली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने गडचिराेली येथे शनिवार २३ जानेवारीला सायकल दाैड स्पर्धा दाेन गटांत घेण्यात आली. या स्पर्धेत खुल्या गटातून इंदिरानगरचा प्रवीण वासेकर तर शालेय गटातून गडचिराेली येथील साहिल गेडाम अव्वल ठरला.

सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर, ग्रँडमास्टर एंजल देवकुले हिच्या हस्ते सायकल दाैड स्पर्धेला भगवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. खुल्या गटासाठी शिवसेना कार्यालय चामाेर्शी राेड ते शिवणी व परत शिवसेना कार्यालय असे १६ किमी अंतर ठेवण्यात आले. शालेय गटासाठी शिवसेना जिल्हा कार्यालय ते वाकडी असे ६ किमी अंतर ठेवण्यात आले. या गटात इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थी स्पर्धकांचा समावेश हाेता. खुल्या गटात प्रथम आलेल्या प्रवीण वासेकरने ५ हजार रुपये राेख व स्मतिचिन्ह असे पारिताेषिक पटकाविले, तर चंद्रपूर येथील शंकर फाले याने ३ हजार ५०० रुपयांचे द्वितीय बक्षीस तर उपरी येथील विशाल भांडेकर याने तृतीय २ हजार ५०० रुपयांचे राेख पारिताेषिक पटकाविले. शालेय गटात प्रथम क्रमांक साहिल गेडाम याने ५ हजार रुपये राेख, उदय चटवा याने द्वितीय क्रमांकाचे ३ हजार ५०० रुपयांचे पारिताेषिक तर हिमांशू धनगून याने २ हजार ५०० रुपयांचे तृतीय पारिताेषिक पटकाविले. काही स्पर्धकांना प्राेत्साहन पारिताेषिक देण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, जिल्हा संघटक विलास काेडापे, उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, जिल्हा समन्वयक सुनील पाेरेड्डीवार, उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, शहरप्रमुख रामकिरीत यादव, तालुकाप्रमुख गजानन नैताम, उपतालुकाप्रमुख यादव लाेहंबरे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, संजय बाेबाटे, माणिकराव ठाकरे, गणेश दहेलकर, घनश्याम काेलते, राजू ठाकरे, संदीप आलबनकार, ईश्वर लाजुरकार, बालाजी फुकटे, विनायक चनेकार, राहुल चनेकार, सूरज उईके, साैरव मडावी, भूपेंद्र गेडाम, अमाेल मेश्राम, भरत कांबळे, सुभाष ठाकरे, तानाेबा दाजगाये, स्वप्निल खांडरे, निकेश लाेहंबरे, लाेभाजी झाडे, गाेपाल पानसे, दिवाकर आत्राम, हिवराज मेश्राम, एकनाथ काेलीवार, अजय ठाकरे, अनिल मडावी, राजेंद्र उंदीरवाडे, सदाशिव वरखडे, सचिन मेश्राम, माधव चाैधरी, नेपाल लाेहंबरे, माेहन कळमकर आदी शिवसैनिक उपस्थित हाेते.