जिल्ह्यात खरीप व रब्बी पिके घेतली जातात. दोन्ही पिके निघाल्यावर शेतात असलेला केरकचरा तसेच धान पिकातील धसकटे मशागतीत अडचणीची ठरत असल्याने ती गाेळा करून जाळली जातात. ज्या ठिकाणी धान पऱ्हे टाकली जातात, त्या भात खाचरांची चांगली साफसफाई करावी लागते. त्यामुळे तणस टाकून ती जाळली जातात. या कामासाठी शेतकरी सकाळीच शेतात जाऊन आगी लावतात. यासोबतच शेतात असलेल्या तणसाचा वापर करीत आग लावली जात आहे. काही शेतकरी गरजेपुरतेच तणस घरी घेऊन जातात व उर्वरित तणस शेतात दरवर्षी जाळून टाकत असतात. सध्या जनावरांची संख्या कमी झाल्याने शेतकरी तणस गाेळा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यासोबतच शेतकरी शेतातील नांगरणी व वखरणीचे काम करताना दिसून येत आहेत.
===Photopath===
290521\31211430-img-20210529-wa0122.jpg
===Caption===
शेतातील धूर देताहेत आंतर मशागतीच्या कामाचे संकेत