शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विजेअभावी धानपीक धोक्यात

By admin | Published: April 16, 2017 12:33 AM

विसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली.

शेतकरी संतप्त : पिकांच्या पाणीपुरवठ्यात अडचणअतुल बुराडे विसोराविसोरावरून पूर्वेला एक किमी अंतरावरील गाढवी नदी काठावर शंकरपूरच्या शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी धान पिकाची लागवड केली. मात्र विजेच्या लपंडावाने पाण्याअभावी सदर उन्हाळी धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त करीत आहेत.विसोरा-शंकरपूर या दोन गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या गाढवी नदीच्या पाण्याच्या भरवशावर विसोरा, शंकरपूर येथील शेतकऱ्यांनी नदीच्या शंकरपूर कडील शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली. धान पिकाच्या उत्पादनासाठी बी-बियाणे नांगरणी, वखरणी, पेरणी, चिखल, रोवणी, निंदण, औषध फवारणी, कापणी, मळणी या सर्व जंजाळातून धानरास घरी येण्यासाठी धान पिकाला पाणी पुरवठा आवश्यक आहे. मात्र मागील महिनाभरापासून शंकरपूर नदी घाटावरील डीपीवर डीओ व फेज जात असल्याने शेतीला पाणी पुरवठा करणे अशक्य होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने या परिसरातील धानपीक करपल्यागत झाले आहे. वीज पुरवठा सुरू झाल्यावर अगदी काही वेळात वीज पुरवठा खंडीत होते. परिणामी पिकाला पुरेसे पाणी होत नसल्याने उभ्या पिकाखालील जमिनीला भेगा पडल्या असून येत्या आठवड्याभरात धान पीक पूर्णत: करपण्याची शक्यता आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकरी कमालीचा संतापला आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी येत नाही. त्यामुळे गावातीलच नागरिक व शेतकरी स्वत: दिवस रात्र एक करून वीज पुरवठा सुरू करतात. महिनाभरापूर्वी नवीन डीपी सुरू करण्यासाठी महावितरणकडे रितसर अर्ज करण्यात आला होता. मात्र या अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खंडीत वीज पुरवठ्याची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेकडो एकरवरील धान पीक करपून नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर समस्या दूर करण्यासाठी आमदार क्रिष्णा गजबे यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सदर समस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सायंकाळी उशिरापर्यंत परत त्याच डीपीवरून अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून वीज पुरवठा सुरू केला. तरीही नवीन डीपीची मागणी कायम आहे.महावितरणचे अधिकारी गैरहजर गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी शनिवारी दुपारच्या सुमारास शंकरपूर येथील १०-१५ शेतकऱ्यांनी थेट देसाईगंज येथील महावितरणचे कार्यालय गाठले. मात्र या कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने चर्चा होऊ शकली नाही. ज्या डीपीवरून शेतकऱ्यांच्या शेतीला वीज पुरवठा होतो. ती डीपी वारंवार पेट घेतल्याने पूर्णत: खराब झाली आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक कृषीपंप डीपीला जोडल्याने ही वीज खंडीत पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. सातत्याने मागणी करूनही सद्य:स्थितीत नवीन डीपी लावणे शक्य नसल्याची स्पष्टोक्ती अभियंता शेतकऱ्यांना देतात.